इचलकरंजी : जम्मू-काश्मीर कथुआ येथील आठ वर्षीय मुलीवर झालेला अत्याचार, तसेच उत्तर प्रदेशमधील उन्नाव, गुजरातमधील सूरत व जबलपूरमधील दोन सख्ख्या बहिणींवर झालेला अत्याचार आणि खून या सर्व दुर्दैवी घटनेतील दोषी असणाऱ्या नराधमांना फाशी द्यावी, या मागणीसाठी शहर परिसरातील मुस्लिम समाजाने शुक्रवारी प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढून प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन दिले.वखारभाग येथील चॉँदतारा मस्जिद येथून या मूक मोर्चास प्रारंभ झाला. तेथून मुख्य मार्गांवरून मोर्चा के. एल. मलाबादे चौक परिसरातून वळसा घालून बंगला रोडने प्रांत कार्यालयावर आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मोर्चासमोर निवेदन देण्यासाठी आलेल्या मुलींनी मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये सुजान शेख, ताहेरा म्हैशाळे, सफिया शिरोले, बुशरा राऊत, सिफा बागवान, तुबा सनदी या मुलींचा समावेश होता.यावेळी उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे ४ जून २०१७ रोजी एका तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचार त्यानंतर सूरतमधील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिला ठार मारण्यात आले. जबलपूर येथील दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आला. या सर्व घटना निंदनीय असून, याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच या सर्व गुन्ह्यांतील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. देशामध्ये वारंवार घडणाºया अत्याचाराच्या घटनांना पायबंध बसावा, यासाठी शासनाने त्वरित पावले उचलत कडक कायदे निर्माण करून सर्व महिलांना सुरक्षितता प्रदान करावी. तसेच निर्भया पथक अद्ययावत करावे, रात्रगस्त वाढवावी, शाळा-कॉलेजमध्ये मुलींना स्व:संरक्षणाचे धडे द्यावेत. त्याचा अभ्यासक्रमात समावेश करावा. बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात चालवून पीडितांना तत्काळ न्याय द्यावा. अल्पवयीन मुलगी दहा वर्षांच्या आतील असल्यास थेट फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी. अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मोर्चामध्ये इचलकरंजीस कबनूर, शहापूर, कोरोची, चंदूर, हातकणंगले, तारदाळ, खोतवाडी येथील मुस्लिम बांधव व नागरिक सहभागी झाले होते.मोर्चामधील घोषवाक्येमूक मोर्चामध्ये विविध घोषवाक्य असलेले फलक दर्शविण्यात आले. त्यामध्ये राजे, तुम्ही असता तर आज आया-बहिणींवर ही वेळ आली नसती, नराधमांना फाशी द्या, वुई वॉन्ट जस्टीस या घोषवाक्यांचा समावेश होता.मोर्चात विविध वेशभूषामोर्चामध्ये विविध वेशभूषा धारण केलेल्या मुलींना ट्रॉलीवर बसवून त्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आले. यात झाशीची राणी, रजिया सुल्ताना, सानिया मिर्झा यासह सर्वधर्मीय महिलांची वेशभूषा साकारण्यात आली होती.
इचलकरंजीत मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा : कथुआतील प्रकरणाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:17 AM
इचलकरंजी : जम्मू-काश्मीर कथुआ येथील आठ वर्षीय मुलीवर झालेला अत्याचार, तसेच उत्तर प्रदेशमधील उन्नाव, गुजरातमधील सूरत व जबलपूरमधील दोन सख्ख्या बहिणींवर झालेला अत्याचार आणि खून या सर्व दुर्दैवी घटनेतील
ठळक मुद्देआरोपींना फाशी देण्याची मागणी