शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

इचलकरंजीची तहान भागणार तरी कधी ?

By admin | Published: November 06, 2014 11:08 PM

नियोजनाचा अभाव : सर्वसामान्यांना भुर्दंड

राजाराम पाटील - इचलकरंजी -पंचगंगा व कृष्णा या सतत बारमाही वाहणाऱ्या नद्या आणि दोन्ही नद्यांवरून शहराला पाणी उपसा होत असूनही केवळ नियोजन व समन्वयाच्या अभावाने दोन ते तीन दिवसांतून पाणीपुरवठा होत असतो. नळांना मीटर बसविण्याची कणखर भूमिका लोकप्रतिनिधी व प्रशासन घेत नसल्याने अतिरिक्त पाणी वापरण्याचा भुर्दंड सर्वसामान्यांवर पडतो आहे, तर कृष्णा नळयोजनेच्या पाण्याची चोरी (गळती) मोठ्या प्रमाणावर होत असून, त्याचे पैसे शहरवासीयांच्या बोकांडी बसत आहेत.शहराला आवश्यक असलेले पाणी पंचगंगा नदीतून दोन पंपांमार्फत आणि कृष्णा नदीतून दोन पंपांच्या साहाय्याने उचलले जाते. पंचगंगेतील पाणी २५० अश्वशक्ती व १०० अश्वशक्तीच्या दोन पंपांतून उपसा केले जाते. या पंपातून दररोज आठ दशलक्ष लिटर पाणी मिळते, तर कृष्णा नदीतील ४६ दशलक्ष लिटर पाणी दररोज ५४० अश्वशक्तीच्या पंपाने उचलले जाते. अशाप्रकारे दररोज ५४ दशलक्ष लिटर पाणी उचलले जात असताना प्रत्यक्षात मात्र ४० दशलक्ष लिटर इतकेच पाणी शहरवासीयांना पुरविले जाते.कृष्णा नळपाणी योजनेद्वारे मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील नदीतून पाण्याचा उपसा करते. या पाण्याला कुरुंदवाड, शिरढोण, टाकवडेमार्गे इचलकरंजीत पोहोचण्यासाठी १७.६ किलोमीटर अंतर पार करावे लागते. या अंतरामध्ये विशेषत: शिरढोण व टाकवडे हद्दीत अनधिकृतरीत्या पाण्याच्या अनेक जोडण्या आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी असलेले एअरव्हॉल्व्ह ढिले करून तेथूनही पाण्याची चोरी होते, असा पालिकेकडील पाणी पुरवठा विभागाचा अहवाल आहे. अशा प्रकारच्या गळती-चोरीमुळे नदीतून ४६ दशलक्ष लिटर पाणी उचलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र ३८ दशलक्ष लिटर इतकेच पाणी जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत पोहोचते. पंचगंगा नदीतील व कृष्णा नदीतून उचललेल्या पाण्यावर जलशुद्धिकरण केंद्रामध्ये प्रक्रिया झाल्यानंतर शहरवासीयांना ४० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो.पाणी दोन ते तीन दिवसांतून एक वेळ पुरविले जात असल्याने नागरिक या पाण्याची साठवणूक करतात. त्याचबरोबर शहरामध्ये पाणीपुरवठा विभागाकडील अहवालानुसार ३७ हजार १३४ पाण्याच्या जोडण्या असून, त्यापैकी ८८६ जोडण्या औद्योगिक आहेत; पण शहरात विविध ठिकाणी असलेल्या झोपडपट्ट्या आणि अन्य वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक नळ पुरविले आहेत. त्यांची संख्या सुमारे ७०० असावी, असा अंदाज आहे. याशिवाय विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयांना ५०, पालिकेकडील सार्वजनिक सभागृहांना १२, सार्वजनिक शौचालयांना ४०, जलतरण तलावासाठी २ अशा जोडण्या देण्यात आल्या आहेत, तर पालिकेने बीओटी तत्त्वावर दिलेल्या जनावरांच्या कत्तलखान्यासाठी अडीच इंची नळाची जोडणी दिलेली आहे. अशा कारणांमुळे शहरवासीयांना दररोज आवश्यक असलेले ४० दशलक्ष लिटर पाणी असूनसुद्धा एक दिवसाआड पुरविले जाते.साधारणत: डिसेंबर महिन्यानंतर पंचगंगा नदीचे पाणी दूषित होते. परिणामी, पंचगंगेतील पाण्याचा उपसा जून महिन्यापर्यंत बंद केला जातो. या सहा महिन्यांच्या काळात फक्त कृष्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून राहिल्यामुळे तीन दिवसांतून एक वेळ असे पाणी शहरवासीयांना मिळते. सर्वसामान्य कुटुंबांना लागणाऱ्या पाण्यापेक्षा जादा पाणी श्रीमंत कुटुंबांना लागते. त्याचबरोबर उपहारगृहे व अन्य उद्योगधंदे असलेल्या औद्योगिक जोडण्यांनासुद्धा अधिक पाणी पुरवावे लागते. या सर्वच नळांना जलमापन मीटर नसल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांना श्रीमंतांसाठी लागणाऱ्या जादा पाण्याच्या आकारणीचा भुर्दंड बसतो. (क्रमश:)मीटर बसल्यास दररोज पाणी शक्यआदर्श प्रमाणानुसार नळाद्वारे प्रत्येक माणसी १३५ लिटर पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. इचलकरंजी शहरात असलेल्या तीन लाख लोकसंख्येला या प्रमाणानुसार ४०.५ दशलक्ष लिटर पाणी पुरविले पाहिजे. सध्या दररोज सरासरी ४० दशलक्ष लिटर प्रत्यक्ष पाण्याचा पुरवठा केला जातो. परिणामी, इचलकरंजीतील नळांना मीटर बसल्यास सध्याचे पाणी दररोज पुरविणे शक्य आहे.दररोज वीस टक्के पाण्याची बचतशहरात झोपडपट्ट्या व अन्य ठिकाणी देण्यात आलेल्या सुमारे ७०० सार्वजनिक नळ जोडण्या, सार्वजनिक शौचालयांच्या ४० नळ जोडण्या, छोट्या-मोठ्या १२ उद्यानांना सिंचन करण्यासाठीही दिलेले नळ, दोन जलतरण तलाव, १२ मंगल कार्यालये आणि कत्तलखान्याला दिलेली अडीच इंची नळ जोडणी यांचे योग्य नियोजन झाल्यास आणि सार्वजनिक नळ जोडण्या टप्प्याटप्प्याने बंद केल्यास दररोज किमान वीस टक्के पाण्याची बचत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.