इचलकरंजी : अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन टोळ्यांतील दहाजणांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. राजू ऊर्फ सूरज भोरे आणि आकाश वासुदेव अशी त्या दोन्ही टोळीप्रमुखांची नावे असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी दिली.
राजू ऊर्फ सूरज सौदागर भोरे (रा. निमजगा माळ झोपडपट्टी), समीर ऊर्फ बशीर मेहबूब शेख (रा. भोनेमाळ), संतोष हिमतसिंग बागडे (रा. धारवट झोपडपट्टी), गणेश मारुती शिरगन्नावर (रा. बरगे मळा) व बिरजू ऊर्फ सतीश विलास रजपूत (रा. शांतीनगर) ही एक टोळी, तर आकाश संजय वासुदेव, वैभव सुखदेव नारकर (दोघे रा. भोनेमाळ), किरण बबन लोहार (रा. जवाहरनगर), अक्षय अजित पाटील (रा. विवेकानंद कॉलनी) व सागर विठ्ठल आमले (रा. कोरोची) ही दुसरी टोळी आहे. या टोळीतील संशयितांवर खून, चोºया, हाणामारी, घरफोडी, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या दोन टोळीतील दहाजणांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना अटक करून जिल्ह्याबाहेरील विविध ठिकाणी सोडण्यात आले. अशा शहरातील आणखीन काही टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई व्हावी, यासाठीचे प्रस्ताव पाठविले आहेत. ते प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर गुन्हेगारीवर वचक बसेल, असेही नरळे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत पोलीस निरीक्षक सतीश पवार, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, उपनिरीक्षक अनिल मोरे उपस्थित होते.मटका बुकीवर छापा; सहाजणांना अटकइचलकरंजी : येथील जवाहरनगर परिसरात सुरू असलेल्या मुंबई मटका बुकीवर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ३६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी अड्ड्यावरील सहाजणांना अटक केली आहे, तर बुकीचालक हणमंत निवृत्ती जाधव हा फरार आहे.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, हणमंत जाधव हा जवाहरनगर परिसरात मटका अड्डा चालवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शिवाजीनगर पोलिसांनी कोरवी गल्लीत बाबर यांच्या भाड्याने घेतलेल्या खोलीतील अड्ड्यावर छापा टाकला. त्याठिकाणी प्रल्हाद रामचंद्र तिप्पे (वय ४९), विनायक आनंदा होगाडे (२६), अवधूत निवृत्ती खोत (३१), संदीप प्रकाश कोरवी (२७), मंगेश शांतीलाल घोलप (२३, सर्व रा. जवाहरनगर) आणि इरफान मौला मुल्ला (२८, रा. टाकवडे) हे सहाजण मटका घेत असताना सापडले. पोलिसांनी या सर्वांना अटक करून त्यांच्याकडून १५ हजार ३२० रुपयांच्या रोख रकमेसह मटक्याचे साहित्य, आठ मोबाईल संच असा ३६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.