कोल्हापूर : अहमदनगर येथील तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, मयूरेश पाटील यांनी तयार केलेले व कागल तालुक्यात कार्यान्वित असलेले ऑनलाईन शाळा हे ॲप संपूर्ण राज्यात लागू करण्याचा विचार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्यांत ते पायलट प्रोजेक्ट म्हणून वापरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ऑनलाईन ॲपबाबत मंत्री मुश्रीफ यांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. यामध्ये ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव अरविंदकुमार, कागलचे गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर, तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, मयूरेश पाटील, महादेव गुरव, रमेश कदम, रवींद्र पाटील, आदी उपस्थित होते.कोरोना महामारी संपल्यानंतरसुद्धा हे ॲप कायमस्वरूपी कसे उपयोगी पडेल, उजळणी कशी घेता येईल व इतर आनुषंगिक बाबींची सविस्तर माहिती या बैठकीत देण्यात आली. कोल्हापूर व अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन ॲप कार्यान्वित करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.
ऑनलाईन शाळा ॲप राज्यभर वापरण्याचा विचार - हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 7:18 PM
अहमदनगर येथील तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, मयूरेश पाटील यांनी तयार केलेले व कागल तालुक्यात कार्यान्वित असलेले ऑनलाईन शाळा हे ॲप संपूर्ण राज्यात लागू करण्याचा विचार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
ठळक मुद्देऑनलाईन शाळा ॲप राज्यभर वापरण्याचा विचार - हसन मुश्रीफ मंत्रालयातील बैठकीत घेतला आढावा : आराखडा तयार करण्याच्या सूचना