या रुग्णालयाच्या अंतर्गत भुदरगड तालुक्यातील अतिग्रामीण व डोंगराळ भाग जास्त आहे. चिक्केवाडीसारख्या भागातून माणसे येत असतात. त्यामुळे त्यांना सेवा देण्यासाठी येथील कर्मचारी नेटच्या रेंजसाठी कधी उन्हात, कधी उंचवट्यावर तर कधी रस्त्यावर उभे राहून रजिस्ट्रेशनचे काम करतात. पण लसीकरणात अडथळा येऊ देत नाहीत. बऱ्याचदा फोनलाही रेंज नसते. भुदरगडमधील या गैरसोयीची लोकप्रतिनिधींनी दखल घेणे गरजेचे आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. वाय. वर्धम, आरोग्य सहाय्यक अधिकारी अवि पाठक, कपिल ढोणुक्षे, प्रतीक्षा इंदुलकर, एस. डी. भोईटे, किशोर पाटील, रुपेश पांढरे, गोकुळा पाटील, आर. एस. मालवेकर, नीता पाटील, अनिल सावंत, राजर्षी पाटकर, सरिता बागडी, आर. एस. पाटील हे कर्मचारी अहोरात्र राबत आहेत. या कर्मचारी वर्गाचे या विभागातून कौतुक होत आहे.
पाटगावात लसीकरणाचे आदर्श नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:25 AM