कोल्हापूर: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना अमन मित्तल यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांची जर कोल्हापूरजिल्हाधिकारीपदी नियुक्ती होणार असेल तर जनआंदोलन उभारू असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांनी दिला. शनिवारी दुपारी भाजप जिल्हा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार बैठकीत त्यांनी मित्तल यांच्यावर अनेक आरोप केले. निंबाळकर म्हणाले, कोरोना काळात मेलेल्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार मित्तल यांनी केला असून सुमारे ३५ कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. लातूर महापालिका आयुक्त आणि जळगाव जिल्हाधिकारी पदावर असतानाही त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरला त्यांना जिल्हाधिकारी म्हणून आणून आपल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत मित्तल यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती होऊ नये अशी आपली जाहीर मागणी आहे. त्यातूनही नियुक्ती झाल्यास मोठे जन आंदोलन उभारू.
Kolhapur: अमन मित्तल यांना जिल्हाधिकारी केल्यास जनआंदोलन उभारु, भाजप जिल्हाध्यक्षांचा इशारा
By समीर देशपांडे | Published: September 02, 2023 3:46 PM