कोल्हापूर : शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एकटा लढला. तरीही आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राजू शेट्टी यांच्या आघाडीच्या नेत्यांच्या तोंडाला फेस आणला. तुम्ही सर्वजण एकत्र आल्यानंतरही आम्ही निम्म्याहून अधिक जागा जिंकल्या. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभेत काय होणार हे स्पष्ट आहे. हिंमत असेल तर वेगवेगळे लढा, कोण सरकार करतंय ते बघूया, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही काँग्रेस आणि ‘स्वाभिमानी’ला खुले आव्हान दिले आहे.
शिरोळ नगरपालिका निकालानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीराज यादव यांचा केवळ ३३ मतांनी पराभव झाला. १७ नगरसेवकांपैकी ८ जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत, तर तीन जागा ९, १२, २२ इतक्या अल्प मतांनी पडल्या. आणखी एक जागा आली असती तर उपनगराध्यक्षासाठी १७ पैकी ९ म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जागा भाजपच्या झाल्या असत्या, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी वेगवेगळे लढूच शकत नाहीत म्हणून रोज एकत्र येऊन काथ्याकुट करत आहेत. जागावाटपात त्यांचे एकमत होणार नाही, एकमत झालेच तर मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होणार आहे. एकत्र येऊनसुद्धा आम्हीच तुम्हाला पाडू, हिंमत असेल तर वेगवेगळे लढा, असे खुले आव्हानही पाटील यांनी दिले आहे. स्वतंत्र लढून राज्यात आम्ही १२३ जागा जिंकल्या. त्यामुळे एकटे लढा हा सल्ला तुम्ही देऊ नका, असेही त्यांनी सांगितले. तसेच भाजपला भरभरून मते दिल्याबद्दल शिरोळच्या जनतेचे पाटील यांनी आभार मानले आहेत.उल्हास पाटील यांनी हसे करून घेतलेभाजपला हरविण्यासाठी शिरोळ नगरपालिकेत राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राजू शेट्टी हे एकत्र आले, हे कमी म्हणून की काय, आदल्या रात्री शिवसेनाही त्यांच्यासोबत गेली.
आमदार उल्हास पाटील यांनी आपण उभा केलेला उमेदवार आघाडीसोबत जोडताना विचार करायला हवा होता.भाजप आणि पृथ्वीराज यादव यांच्यावरील रागामुळे आमदार उल्हास पाटील यांनी या निवडणुकीत आपले हसे करून घेतले. त्यांच्या उमेदवाराला जेमतेम १३०० मते पडली.याचा अर्थ रात्रीत ही सगळी मते आघाडीकडे वळवल्याचे स्पष्ट झाल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.शिरोळ नगरपालिका निवडणूक