कोल्हापूर : यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत हे त्यांचे वैयक्तिक आहे. पक्षाचा आदेश नेहमीच शिरसावंद्य मानणारे मंत्री पाटील यांना जर आदेश मिळाला तर ते मैदानात उतरतील, असा दावा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी शुक्रवारी केला.भाजप शहर कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, आर. डी. पाटील, विजय जाधव, राहुल चिकोडे उपस्थित होते.जाधव म्हणाले, पक्षासाठी तन, मन अर्पण केलेल्या चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे वैयक्तिक मत वेगळ्या संदर्भामध्ये व्यक्त केले. त्यांनी सक्रियपणेच राजकारणामध्ये लढले पाहिजे आणि आम्हा लढणाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच ताकद दिली पाहिजे, असे आम्हा कार्यकर्त्यांचे मत आहे. याआधीही त्यांनी ‘आपण कोरे पाकीट’ असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पक्षाचा आदेश आल्यास मंत्री पाटील हे त्याचे पालन करतील, यात शंका नाही. त्यांच्यासारख्या धुरंधर नेतृत्वाची आम्हाला गरज आहे.पत्रकार परिषदेला तुषार देसाई, अशोक देसाई, सुभाष रामुगडे, मारुती भागोजी, विजय खाडे, दिलीप मैत्राणी, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, शंतनू मोहिते उपस्थित होते.
पक्षादेश आल्यास ‘दादा’ मैदानात: महेश जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:38 AM