कोल्हापूर : तुमच्या हातात सत्ता आल्यास महाराष्ट्रात काहीतरी दणकेबाज घडेल. सत्ता आल्यानंतर सत्कार करण्याचा योग येऊ दे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सांगितले असल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तुमच्या भाषणाची, बोलण्याची शैली आणि प्रामाणिकपणावरून तुम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असल्याचेही मी म्हणालो, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी डॉ. पवार यांची घरी जाऊन भेट घेतली. विविध ऐतिहासिक संदर्भांवर त्यांनी पाऊण तास चर्चा केली. त्यानंतर ते कोकणात सावंतवाडीला रवाना झाले. त्यांच्यासोबत मुलगा अमित ठाकरे होता. भेटीनंतर डॉ. पवार यांनी चर्चेतील तपशील पत्रकारांना सांगितला.
ते म्हणाले, इतिहासातील काही संदर्भांसंबंधित ठाकरे यांनी माझ्याकडून जाणून घेतले. करवीर संस्थापिका रणरागिणी ताराराणी यांचा इतिहास जाणून घेतला. इतक्या मोठ्या पराक्रमी स्त्रीबद्दल महाराष्ट्राला फारशी माहिती नाही, असेही निरीक्षण त्यांनी नोंदवले. भाषणात एकवेळ अन्य कुणावरही बोलला नाही तरी चालेल; पण पराक्रमी अशा ताराराणी यांच्या इतिहासावर बोला, जनतेला त्यांचा इतिहास समजणे गरजेचा आहे, असे पवार यांनी त्यांना सुचविले.मंदिरात भडकलेराज ठाकरे हे अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर त्यांच्याजवळ जाऊन फोटो काढून घेणे, पुष्पगुच्छ देण्याचा प्रयत्न काही अतिउत्साही कार्यकर्ते वारंवार करीत राहिले. बंदोबस्तातील पोलिस त्यांना बाजूला सारत होते. तरीही ते पुन्हा ठाकरे यांच्या जवळ येत राहिले. यामुळे ते त्या कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून त्या कार्यकर्त्यांना बाजूला काढले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादनबुधवारी (दि.३०नोव्हेंबर) सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ते दर्शनासाठी अंबाबाई मंदिरात गेले.