शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

संप न मिटल्यास गुरुवारी आंदोलन

By admin | Published: August 11, 2015 12:52 AM

यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात घोषणा : प्रांताधिकारी कार्यालयात आज संयुक्त बैठक

इचलकरंजी : वीस दिवसांपासून सुरू असलेला सायझिंग-वार्पिंग कामगारांचा संप उद्या, बुधवारपर्यंत मिटला नाही, तर गुरुवारी सायंकाळी यंत्रमागधारकांचा मेळावा घेऊन टोकाचे आंदोलन सुरू करण्याचा इशारा सागर चाळके यांनी दिला. सोमवारी झालेल्या यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.सायझिंग कामगारांचा सुरू असलेला संप हा कामगार नेत्यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे चिघळत आहे. यामुळे शहरातील संपूर्ण वस्त्रोद्योग वेठीस धरला जात आहे. परिणामी येथील औद्योगिक शांतताही बिघडत आहे. त्यामुळे याबाबतचा जाब कामगार नेत्यांना सोमवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चावेळी विचारण्यात येईल, असा इशारा रविवारी चाळके यांनी यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात दिला होता. मात्र, यामुळे वातावरण चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे व अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. विनापरवाना असा कोणत्याही प्रकारे प्रतिमोर्चा काढू नये, तसेच तुमच्या प्रश्नाबाबत कामगार प्रतिनिधी व मालक प्रतिनिधी यांची आज, मंगळवारी संयुक्त बैठक प्रांत कार्यालयात घेऊ, त्यावेळी आपण आपले म्हणणे मांडावे, असे सांगितले. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी रात्री उशीर झाल्याने सर्व यंत्रमागधारकांपर्यंत हा संदेश पोहोचला नाही. परिणामी सोमवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासूनच शिवाजी पुतळ्याजवळ यंत्रमागधारक गोळा होऊ लागले. त्यावेळी यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींनी सर्वांना पुन्हा तांबे माळमधील मराठा भवनात जमण्यास सांगितले. त्यानंतर तेथे झालेल्या मेळाव्यात चाळके यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी सर्व यंत्रमागधारकांना सांगितली आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन दोन दिवस आंदोलन स्थगित करून गुरुवारपर्यंत मुदत देण्याचे ठरविले. प्रशासनाने उद्यापर्यंत तोडगा काढावा; अन्यथा गुरुवारी टोकाची भूमिका जाहीर करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. मेळाव्यात यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, पॉपलीन संघटनेचे सचिन हुक्किरे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)संप काळात ४०७ रुपयांप्रमाणे पगार द्याकृती समितीची मागणी : सहायक कामगार आयुक्तांना निवेदन इचलकरंजी : सायझिंग कामगारांच्या संपास आमचा पाठिंबा असून, संप काळात बंद पडलेल्या यंत्रमाग कारखान्यांतील कामगारांना दररोज ४०७ रुपयांप्रमाणे पगार मिळाला पाहिजे, अशी मागणी यंत्रमाग कामगार संघटनांच्या कृती समितीने सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याकडे केली.यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने सुधारित किमान वेतन जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी शासनाने करावी, या मागणीसाठी यंत्रमाग कामगारांच्या संयुक्त कृती समितीने राज्यव्यापी आंदोलन हाती घेतले आहे. त्यापैकी सोमवारी यंत्रमाग कामगारांचा लाक्षणिक संप होता. कृती समितीने केलेल्या आवाहनाप्रमाणे यंत्रमाग कामगार शाहू पुतळा चौकातून मोर्चाने सहा. कामगार आयुक्त कार्यालयावर आले. समितीचे एक शिष्टमंडळ सहायक कामगार आयुक्त गुरव यांना भेटले. यंत्रमाग कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेले १०,५७३ रुपये किमान वेतन त्वरित मिळावे. वाढत्या महागाईने १५,००० रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे. संपामुळे बंद कारखान्यांतील कामगारांना प्रतिदिवशी ४०७ रुपये पगार मिळावा. घरकुलांसाठी पाच लाख रुपये अनुदान द्यावे, अशा मागण्या केल्या. त्यावर सहायक कामगार आयुक्तांनी किमान वेतनासाठी क्लेम अ‍ॅप्लिकेशन दाखल करण्याचे सांगितले. त्यानंतर मोर्चासमोर शामराव कुलकर्णी, दत्तात्रय माने, भरमा कांबळे, हणमंत लोहार, राजेंद्र निकम, आनंदा गुरव, आदींची भाषणे झाली. (प्रतिनिधी)