शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

हेरिटेज वास्तूला बाधा नसेल तर पंचगंगा घाटास परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:16 AM

कोल्हापूर : पंचगंगा नदी घाटाच्या परिसरात होणाऱ्या नियोजित विकासकामांच्या आराखड्यामुळे हेरिटेज वास्तूला बाधा येते का, याची संयुक्त छाननी ...

कोल्हापूर : पंचगंगा नदी घाटाच्या परिसरात होणाऱ्या नियोजित विकासकामांच्या आराखड्यामुळे हेरिटेज वास्तूला बाधा येते का, याची संयुक्त छाननी करून जर बाधा येणार नसेल तर केंद्रीय पुरातत्त्व विभागाची ‘एनओसी’ मिळविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करा, अशा सक्त सूचना गुरुवारी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जर हेरिटेज कमिटीला काही शंका असतील तर त्यांनी जागेवर कागदोपत्री पुराव्यानिशी हेरिटेज वस्तूला धक्का लागतो हे सिद्ध करावे, जर असे सिद्ध झाले नाही तर हेरिटेज कमिटीने या कामास विनाशर्त परवानगी उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. विकास कामात कोणी आडवा येत असेल तर ते योग्य नाही, त्यांनी असे प्रयत्न करणे चुकीचे आहे, अशा शब्दात खासदार मंडलिक यांनी नाराजी व्यक्त केली.

पंचगंगा घाटाचे काम लवकर सुरू व्हावे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, हेरिटेज कमिटी सदस्य यांची संयुक्त बैठक गुरुवारी मंडलिक यांनी घेतली. या बैठकीत बांधकाम विभाग व आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर यांनी आराखड्यांना यापूर्वी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने एनओसी दिल्यानंतर कामाला सुरुवात केली होती; परंतु तक्रारी आल्याचे सांगून हेरिटेज कमिटीच्या सूचनेनुसार महापालिकेने काम थांबविले असल्याचे सांगितले.

पंचगंगा घाट विकासाचे काम झालेच पाहिजे, ज्या कोणी तक्रारी केल्या आहेत त्यात कितपत तथ्य आहे याची खात्री करून घ्या, विकासकामामुळे हेरिटेज वास्तूला कुठे बाधा पोहचते का तपासून पाहा, जर कोणतीच बाधा पोहचत नसेल तर तुम्ही सर्वजण सोमवारी एकत्र बसून चर्चा करा आणि सामूहिकपणे केंद्रीय पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना खासदार मंडलिक यांनी दिल्या.

बैठकीला सहायक संचालक रामचंद्र महाजन, कांबळे, बांधकाम विभागाचे उपअभियंता भोसले, महापालिकेचे अभियंता सुनील भाईक, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दिघे, प्रशांत हडकर, हेरिटेज कमिटी अध्यक्षा अमरजा निंबाळकर, सदस्य उदय गायकवाड उपस्थित होते.

निंबाळकर बैठकीतून निघून गेल्या -

बैठक संपता संपता आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर आराखडा समजावून सांगत असताना हेरिटेज कमिटीच्या अध्यक्ष अमरजा निंबाळकर बैठक सोडून न सांगता निघून गेल्या. त्या निघून जाण्याचे कारण कोणालाच कळले नाही; परंतु त्यांच्या जाण्यामुळे खासदार मंडलिक यांच्यासह सगळेच अचंबित झाले.