शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

...तर गाडगीळांचा जाहीर सत्कार करू

By admin | Published: September 21, 2015 11:04 PM

महापौरांचा पलटवार : घोटाळेबहाद्दरांची नावे जाहीर करण्याचे आव्हान

सांगली : भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ २००८ ते २०१३ मधील महापालिकेच्या कारभारावर बोलले ते बरे झाले. या काळात स्थायी समितीचे सभापती, उपमहापौर कोण होते, कुणाच्या नेतृत्वाखाली कारभार सुरू होता, त्यांची नावेही त्यांनी जाहीर करावीत. निष्कारण काँग्रेसला बदनाम करू नये. या काळातील कारभाराची चौकशी करून, गैरकारभार झाला असल्यास महापौर म्हणून त्यांचा सांगलीतील गणपती मंदिरासमोर जाहीर सत्कार करू, असा पलटवार महापौर विवेक कांबळे यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला. आ. गाडगीळ यांनी महापालिकेत पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी हा जावईशोध कुठून लावला, असा सवाल करीत कांबळे म्हणाले की, विरोधी राष्ट्रवादीचे नेते पाचशे कोटींचा निधी आणल्याचे सांगतात, तर गाडगीळ पाचशे कोटींचा घोटाळा झाला म्हणतात. म्हणजे महापालिकेला हजार कोटी मिळाले का? इतका निधी आला असता, तर सांगलीचे लंडन झाले असते, असा टोलाही लगाविला. स्थायी समितीचे ऐनवेळेचे ठराव, ६७ (३०) क खाली झालेली कामे, ड्रेनेज, पाणीपुरवठा, घरकुल योजनेच्या ठेक्याचीही चौकशी झाली पाहिजे. हे ठेके कोणाला देण्यात आले, ते कसे मंजूर झाले, याचीही चौकशी होणार असेल, तर सोन्याहून पिवळे. लेखापरीक्षणात यापूर्वी या योजनेचा पंचनामा झाला आहे. आमदारांनी वेळ काढून त्याचाही अभ्यास करावा. केवळ दंतकथा रचून बेछूट आरोप करू नयेत. झोपडपट्टी फक्त त्यांना मतदानावेळी दिसते. त्यामध्ये भ्रष्टाचार दिसतो; पण त्यांच्या वेदना दूर करण्यासाठी ते काय प्रयत्न करीत आहेत? महापालिकेवरील कारवाईसाठी बाह्या सरसावण्यापेक्षा थोडी ताकद निधी आणण्यासाठी त्यांनी वापरावी. ड्रेनेज योजनेचे थर्ड पार्टी आॅडिट होऊन त्याचा अहवालही सादर झाला आहे. आता कशाचे आॅडिट ते करणार आहेत. (प्रतिनिधी)हेच का अच्छे दिन?--महापालिकेचे अनेक प्रश्न शासनदरबारी प्रलंबित आहेत. मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्याचे पत्र आपण दिले आहे. स्वत: गाडगीळ यांना भेटून शेरीनाल्यासाठी ५६ लाख देण्याची मागणी केली होती; पण याकडे लक्ष देण्यास त्यांना व सरकारला वेळ नाही. जनतेस अच्छे दिनचे स्वप्न दाखवून निवडून आलेल्या गाडगीळांना, हेच काय अच्छे दिन? असा सवाल त्यांनी केला.