म्हाकवे : जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार आणि मोठ्या संख्येने जनमत आमच्या मागे असताना आम्ही कोणाच्या मागे फरफटत जाणार नाही. शिवसेना जिल्ह्यातील मोठा भाऊ आहे. भाजपने याचा विचार करून नगरपालिकांमधील सर्वच ठिकाणच्या जागा वाटपात नगराध्यक्षासह आम्हाला योग्य सन्मान (मोठा वाटा) दिलाच पाहिजे, अन्यथा आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत आणि पक्षासाठी प्रसंगी इतर पर्याय स्वीकारावा लागेल, अशी शिवसेना स्टाईलने रोखठोक भूमिका घेत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी जागा वाटपावर अडलेल्या भाजपला सुनावले आहे. हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कारखाना कार्यस्थळावर आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजय घाटगे, बाबासाहेब पाटील, भूषण पाटील, वीरेंद्र मंडलिक, आदी प्रमुख उपस्थित होते. कागल, मुरगूडसह इचलकरंजी, गडहिंग्लज, आदी सर्वच नगरपालिकांत शिवसेनेला नगराध्यक्षांसह जागा वाटपात योग्य सन्मान दिला पाहिजे. तसेच जिल्हापातळीवर भाजपच्यावतीने सर्व पालिकांसाठी कोण बोलणी करणार, हेही स्पष्ट झाले पाहिजे, असे मतही प्रा. मंडलिक यांनी व्यक्त केले. तसेच भाजपने मुरगूड, कागल, गडहिंग्लज, आदी ठिकाणी गतवेळची निवडणूक लढविली नव्हती. राजकारणात पक्षवाढीसाठी प्रत्येक पर्यायाबाबत बोलणी करणे क्रमप्राप्त असते. भाजपकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने कदाचित आमच्या कार्यकर्त्यांनी अन्य पर्यायांकडून जागा मिळविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कागलचे स्थानिक नेते बाबगोंड पाटील व चंद्रकांत गवळी यांचा दोष काय? स्थानिक नेत्यांचा होणारा मान-सन्मान आणि त्यांचा जो निर्णय असेल तोच माझा असेल, असेही ठाम मत प्रा. मंडलिक यांनी व्यक्त केले. आमदार आबिटकर म्हणाले, जिल्ह्या शिवसेना पक्षवाढीसाठी प्रा. मंडलिक यांना सर्वांनीच साथ देऊया. त्यांच्या नेतृत्वाखाली बिद्रीचे सत्ता परिवर्तनही अटळ आहे. बाबासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भूषण पाटील, राधानगरीचे शिवसेनाप्रमुख तानाजी चौगुले, महिला संघटक विद्या गिरी, कागल तालुका प्रमुख अशोक पाटील, राजेखान जमादार, प्रकाश पाटील, बाजीराव गोधडे, बंडोपंत चौगुले-म्हापवेकर, आर. डी. पाटील -कुरुकलीकर, आदी उपस्थित होते. प्रा. एन. एस. चौगुले यांनी आभार मानले. (वार्ताहर) मंडलिक गटाबरोबर राहणे अधिक सुरक्षित : घाटगे मंडलिकसाहेबांच्या जाण्याने पदोपदी पोरकेपणा वाटत होता. मात्र, मंडलिकांनी मिळविलेले वैभव संजय मंडलिकांनी वाढविले आहे. किंबहुना मंडलिकांमधील राजकीय मुरब्बीपणा आणि अनुभव संजय मंडलिकांमध्ये उतरला आहे. कार्यकर्त्यांच्या रक्षणासाठी त्यांची नेहमीच धडपड असते. त्यामुळेच मंडलिक गटाबरोबरच राहणे अधिक सुरक्षित वाटते, असे माजी आमदार संजय घाटगे यांनी जाहीरपणे वक्तव्य करताच उपस्थितांनी त्यांचे टाळ्यांनी स्वागत केले. राजेंचे वारसदार आता भाजपचे नेते ‘शाहू’च्या निवडणुकीत आम्ही सर्वांनी एकतर्फी पाठबळ हा स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांचा कारखाना म्हणून दिले. त्यानंतरच्या भेटीत पालिका निवडणुका एकत्रित लढण्याबाबत चर्चा झाल्या. मात्र, गत आठ दिवसांपूर्वी समरजितसिंह यांनी भाजप प्रवेश केला. आता ते भाजपचे नेते म्हणून आमच्याशी बोलू लागले. शाहूच्या निवडणुकीत त्यांची भूमिका राजेंचे वारसदार म्हणून होती. पण, आता ते भाजपचे नेते म्हणून वावरत आहेत, असा टोलाही प्रा. मंडलिक यांनी लगावला. हमीदवाडाच्या निवडणुकीची भीतीच नाही ४हमीदवाडा कारखान्याची आगामी निवडणूक बिनविरोध होत असेल तर आम्हाला आनंदच आहे. मात्र, कारखाना बिनविरोध करण्यासाठी दबाव आणून आम्हाला कोणी भीती घालत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. ४हयातभर संघर्षाची किनार लाभलेल्या कै. मंडलिकांनी आम्हाला लढण्याची शिकवण आणि उमेद दिली आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही निवडणुकीला घाबरत नाही. कार्यकर्त्यांनी ही भूमिका लक्षात ठेवूनच वाटचाल करावी, असे आवाहनही प्रा. मंडलिक यांनी केल्
सन्मान न मिळाल्यास सेनेपुढे सर्व पर्याय खुले
By admin | Published: November 02, 2016 12:46 AM