शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

संशोधन कराल, तर तरुण राहाल

By admin | Published: April 13, 2016 12:49 AM

राव यांचे प्रतिपादन : शिवाजी विद्यापीठात आर. के. कणबरकर पुरस्कारांचे वितरण

कोल्हापूर : वैयक्तिक लाभापेक्षा आपण समाजाला काय देतो ही गोष्ट आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. वयाच्या संशोधनाचा काही संबंध नसतो, संशोधन करीत राहिलात, तर आयुष्यभर तरुण राहाल. वय सर्जनशीलतेच्या कधीही आड येत नाही, असा सल्ला भारतरत्न व रसायनशास्त्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. सी. एन. आर. राव यांना दिला. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात मंगळवारी विद्यापीठातर्फे डॉ. सी. एन. आर. राव यांना ‘प्राचार्य आर. के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. शालिनी कणबरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रोख १ लाख ५१ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. राव म्हणाले, वयाच्या १७ व्या वर्षापासून मी संशोधनाला सुरुवात केली तेव्हापासून संशोधनात व्यस्त आहे. आश्चर्याची आणि महत्त्वाची बाब म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षापासून माझ्या संशोधनाचे सायटेशन्स व एच इंडेक्स वाढू लागला. याचा अर्थ असा की, वयाचा आणि संशोधन किंवा सर्जनशीलतेचा काहीही संबंध नाही. वयाची कोणतीही मर्यादा न बाळगता मला संशोधन कार्य करता आले याचे मोठे समाधान आहे. संशोधकांनी संशोधकीय सर्जनशीलतेमधील आनंद घ्यावा आणि देशाच्या उन्नतीला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले. राव म्हणाले, नजीकच्या काळात चार कोटी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्याचे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. जलव्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात मोठे काम होण्याची गरज व्यक्त केली. आपल्या देशाला कोणत्या क्षेत्रात आघाडीवर न्यायचे याची दिशा तरुणांनी ठरवायची आहे. त्यासाठी विज्ञानाचा आधार घ्यावा. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, प्रा. राव आणि प्राचार्य कणबरकर या दोघांच्या जीवनात कष्टाच्या तत्त्वज्ञानाचे साम्य आढळते. आयुष्यात आपल्याला काय मिळेल यापेक्षा आपण या देश, समाजाला काय देऊ शकतो, याचा ध्यास या दोघांच्या प्रकृतीमधला समान धागा आहे. त्यामुळे प्राचार्य कणबरकर पुरस्कारासाठी निवड समितीने भारतरत्न प्रा. राव यांची एकमताने निवड केली, याचा अतिशय आनंद वाटतो. प्राचार्य डॉ. बी. ए. खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. अरुंधती पोवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. याप्रसंगी विविध विभागांतील विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कणबरकरांवर चित्रफीतकणबरकर कुटुंबीयांतर्फे डॉ. अरुण कणबरकर यांनी अंबाबाईची मूर्ती व शाल, श्रीफळ देऊन प्रा. राव यांचा सत्कार केला. अनिता शिंदे यांनी श्रीमती इंदुमती राव यांचा सत्कार केला. यावेळी प्रशांत गिरी यांनी तयार केलेल्या प्राचार्य कणबरकर यांच्या जीवन व कार्याचे दर्शन घडविणारी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली.