शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

'एमएच नऊ'चा अभिमान, सोबतच जपा कोल्हापूरची शान - सुनील लिमये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 1:58 PM

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील ६० नामवंतांचा 'ब्रँड कोल्हापूर' पुरस्कार देऊन गौरव

कोल्हापूर : देशभरात कुठेही गेलो तरी 'एमएच-९' मुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. या 'एमएच नऊ'चा अभिमान आहे. तो मिरवलाच पाहिजे, मात्र, एखाद्याबद्दल प्रेम व्यक्त करायचे असेल तरी आपल्या भाषेचा लहेजा हा रागासारखाच वाटतो. त्यामुळे कोल्हापूरची शान अधिक वाढवायची असेल तर बाहेरील लोकांशी बोलताना थोडं प्रेमाने बोला असा प्रेमळ सल्ला राज्याचे निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक व कोल्हापूरचे सुपुत्र सुनील लिमये यांनी गुरुवारी कोल्हापूरकरांना दिला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील ६० नामवंतांचा 'ब्रँड कोल्हापूर' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हॉटेल सयाजी येथे झालेल्या या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात हॉकीच्या प्रचार-प्रसारासाठी आयुष्य वेचलेले कुमार आगळगावकर व भरतकाम कलेला वाहून घेतलेल्या विजयमाला बाबुराव मेस्त्री (पेंटर) यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.लिमये म्हणाले, जातीपातीच्या पलीकडे जाऊन कोल्हापुरने आपली वेगळी ओळख तयार केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचा विचार घेऊन सामाजिक भान जपणारा हा जिल्हा आहे. 'ब्रँड कोल्हापूर'मुळे पुरस्कारकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे, कोल्हापुराचा हा ब्रॅड जपा, तो वाढवा.आ.सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूरकरांमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे. त्याचा सन्मान करण्यासाठीच 'ब्रँड कोल्हापूर' उपक्रम सुरु केला. यामुळे इतरांना प्रेरणा मिळत आहे. खेळाडूंना ज्या सुविधा कमी असतील त्या देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. प्राचार्य महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले. आमदार ऋतुराज पाटील यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमसर्च अध्यक्ष संजय शेटे, साखरतज्ज्ञ विजय औताडे, क्रेडाईचे अध्यक्ष के.पी. खोत, प्रसन्न कुलकर्णी, अजय कोराणे, अमर आडके यांच्यासह विविध संस्था, संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. भरत दैनी यांनी स्वागत केले. अनुराधा कदम यांनी ओळख करून दिली.

राजू राऊत, सिकंदरसह ६ जणांचा विशेष सत्कारशाहीर राजू राऊत, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, स्वप्निल पाटील, सचिन सूर्यवंशी, वैष्णवी पाटील व सचिन कुंभोजे यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.

यांचा झाला 'ब्रँड कोल्हापूर'ने गौरवहर्निश सवसानी, डॉ. करण देवणे, विनायक हेगाणा, निकेत दोशी, राखी पारख,रावी किशोर, विशाल गुडुळकर, वासिम मुल्लानी, मधुर चांदणे, अनुष्का नागोंडा पाटील, नागेश हंकारे, इंद्रजित भोसले, संजय पटेल, जिनेंद्र सांगावे, कल्याणी पाटील, गौरव घेवडे, अक्षय कारेकर, प्रसाद क्षीरसागर, अपूर्वा शेलार, दिग्विजय पाटील, आरती पाटील, सोनबा गोंगाने, अभिज्ञा पाटील, स्वाती शिंदे, अश्विनी मळगे, सोनल सावंत, स्वप्नाली वायदंडे, महेश गवंडी, स्वप्निल जंत्रे, शिवम गेजगे, यशराज पाटणकर, तुषार पाटील, अभय हावळ, प्रतीक्षा पोवार, हर्षदा परिट, सुमंत कुलकर्णी, सृष्टी रेडेकर, शुक्ला बीडकर, सुजित तिकोडे, अनिकेत माने,

दीक्षा शिरगावकर, सोनम मस्कर, ऋतुजा पाटील, निखिल कदम, पवन माळी, अरबाज पेंढारी, संकेत साळोखे, पार्थ मिरगे, रिया पाटील, ऋतुराज पाटील, विराजबाला भोसले, शुभांगी पाटील, धनश्री इंगळे, ऋतुराज इंगळे, रिया नितीन पाटील, सुजल पाटील, हर्षवर्धन कदम, सार्थक गायकवाड, ज्ञानेश्वरी पाटील, संतोष रांजगणे या ६० जणांचा 'ब्रँड कोल्हापूर' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर