शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

सीपीआरसह आयजीएम, गडहिंग्लज कोविड रुग्णालये जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 11:30 AM

CoronaVirus Kolhapur-कोविड रुग्णांच्या उपचारासाठी पूर्ण वेळ विलगीकरण रुग्णालय असणे अत्यंत आवश्यक असल्याने कोल्हापूरचे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, इचलकरंजीचे इंदिरा गांधी (आयजीएम) सामान्य रुग्णालय व गडहिंग्लजचे उपजिल्हा रुग्णालय पुढील दहा दिवसांनंतर कोविड रुग्णालये करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

ठळक मुद्देसीपीआरसह आयजीएम, गडहिंग्लज कोविड रुग्णालये जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दहा दिवसांनंतर होणार अंमलबजावणी

कोल्हापूर : कोविड रुग्णांच्या उपचारासाठी पूर्ण वेळ विलगीकरण रुग्णालय असणे अत्यंत आवश्यक असल्याने कोल्हापूरचे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, इचलकरंजीचे इंदिरा गांधी (आयजीएम) सामान्य रुग्णालय व गडहिंग्लजचे उपजिल्हा रुग्णालय पुढील दहा दिवसांनंतर कोविड रुग्णालये करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.या रुग्णालयांसाठी कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवेसह या आदेशाच्या दिनाकांपासून १० दिवसांनी पुढील आदेशापर्यंत कोविडबाधित रुग्णांवरील उपचारासाठी पूर्ण वेळ विलगीकरण रुग्णालय म्हणून कार्यान्वित करण्यात येईल. तिन्ही रुग्णालयांतील इतर आजाराच्या रुग्णांना टप्प्या-टप्प्याने इतर खासगी रुग्णालये, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त खासगी रुग्णालये व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या धर्मादाय रुग्णालयांकडे संदर्भीत करून उपचाराची सोय करण्यात येईल. या रुग्णालयात पुढील आदेश होईपर्यंत कोरोना विषाणुसंशयित रुग्ण तपासणी व औषधौपचार वगळता इतर सर्व आजारांचे बाह्यरुग्ण उपचार सेवा आणि इतर आजारांच्या आंतररुग्णांना द्यावयाच्या वैद्यकीय सुविधा बंद राहतील.या तीन रुग्णालयांतील पर्यायी उपचार व्यवस्था अशी...सेवा रुग्णालय, कसबा बावडा, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी येथेच स्वतंत्र कक्षात व उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथेच स्वतंत्र कक्षात : बाह्य व आंतररुग्ण, इतर खासगी रुग्णालये, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त खासगी रुग्णालय व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या धर्मादाय रुग्णालयाकडे.सर्पदंशावरील उपचार..श्वानदंश, विंचूदंश, सर्पदंशावरील उपचाराकरिता लागणारी सर्व औषधे सीपीआर, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी व उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज यांनी रुग्ण उपचार घेत असलेल्या योजनेतील खासगी - धर्मादाय रुग्णालयास मागणीप्रमाणे उपलब्ध करून द्यायची आहेत.न्यायवैद्यक प्रकरणातील उपचार...या रुग्णालयातील न्यायवैद्यकीय प्रकरणातील रुग्णांच्या तपासणी व उपचार अनुक्रमे सेवा रुग्णालय कसबा बावडा, ग्रामीण रुग्णालय हातकणंगले व नेसरी येथे करण्याचे आहेत. यासाठी आवश्यकतेप्रमाणे तिन्ही शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य घेण्यात यावे. याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाने नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावयाची आहे.शवविच्छेदन सुविधा...सीपीआर, आयजीएम इचलकरंजी व उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे अपघात मृतदेहावरील न्याय वैद्यकीय पोस्टमार्टम सेवा, औषध विक्री सेवा व इतर लॅब्स नेहमीप्रमाणे सुरू राहतील.वैद्यकीय अधिकारी...कोविड रुग्णालयास आवश्यक विशेषज्ञ व इतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्यांचे अधिनस्त इतर रुग्णालयांमधून क्रमपाळीने उपलब्ध करून घ्यावेत. त्याचप्रमाणे खासगीरित्या तात्पुरत्या स्वरूपात अशा विशेषज्ञांची व वैद्यकीय अधिकारी यांची सेवा उपलब्ध करून घेण्यात यावी.बैठक घ्या...जिल्हा शल्यचिकित्सकांनी खासगी व धर्मादाय रुग्णालय व वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांची बैठक घेऊन नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर