शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

शेतकऱ्यांमधील अज्ञानाचा विकास संस्थांकडून गैरफायदा, पाच संस्थांत कोट्यवधीचा अपहार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 12:13 PM

क्षेत्र एकाचे, कर्ज दुसऱ्याचे

काेल्हापूर : शेतकऱ्यांमधील अज्ञान व सचिवांवर गरजेपेक्षा ठेवलेला अधिक विश्वास यामुळेच सहकारी संस्थांमध्ये अपहार होताना दिसत आहेत. गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील पाच मोठ्या विकास संस्थांमध्ये कोट्यवधी रुपयांचे अपहार झाले आहेत. संबधित दोषींवर अपहार रकमेबाबत फौजदारी झाली, संस्थेवर कलम ८८ ची कारवाई झाली. मात्र, वसुलीचे काय? कायदेशीर प्रक्रियेत वसुली अडकली आहे.

सहकारी संस्थांमुळे कोल्हापूरची प्रगती झाली. खऱ्या अर्थाने सहकारामुळेच कोल्हापूर जिल्हा समृध्द झाला. कोल्हापुरातील सहकार चळवळ आजही महाराष्ट्राला दिशादर्शक आहे. मात्र, काही अपप्रवृत्तीमुळे सहकार चळवळ काहीसी बदनाम होताना दिसत आहे. विकास संस्था या ग्रामीण भागातील अर्थवाहिन्या आहेत. मात्र, काही तालुक्यांत या वाहिन्या खिळखिळी करण्याचा प्रयत्न होतो. त्यातूनच दीड वर्षात करवीर, पन्हाळा, चंदगड, हातकणंगले तालुक्यातील पाच संस्थांमध्ये कोट्यवधीचा अपहार झाला आहे. संबधितांवर कारवाई झाली, मात्र वसुली झालेली नाही. एखाद्या संस्थेत अपहार झाला तर दहा-दहा वर्षे वसुली होत नाही. परिणामी, संस्थेचे कामकाज ठप्प होतेच. मात्र, यामध्ये शेतकरी अडकतो.

क्षेत्र एकाचे, कर्ज दुसऱ्याचे

गावातील अनेक शेतकरी विकास संस्थेकडून नियमित कर्ज उचल करतात असे नाही. शासनाकडून बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने संबंधित व्यक्तीच्या क्षेत्रावर कर्ज उचल करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी जागरुक राहिले पाहिजे.

गवती जमिनीवर उसाची उचल

वास्तविक उभ्या पिकांवर शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे धोरण बँकांचे आहे. मात्र अनेक संस्थांमध्ये गवती जमिनीवर ऊस दाखवून पीक उचल केली जाते.

शेतकऱ्यांनी अशी दक्षता घ्यावी...

  • कर्जाची उचल करताना मंजुरी आणि उचलीची खात्री करावी.
  • पीक कर्जाचे पैसे भरताना त्याची पावती घेणे व ती जतन करून ठेवावी.
  • संपूर्ण कर्ज परतफेड केल्यानंतर तसा दाखला घेतला पाहिजे.
  • साखर कारखान्यांकडून परस्पर वसुलीदार येत असेल तर त्याची वेळेत खातरजमा करावी. 

या संस्थांत झाला अपहार -

  • विठ्ठल विकास दिंडनेर्ली, ता. करवीर.
  • विठ्ठल विकास, उंड्री ता. पन्हाळा
  • रवळनाथ विकास, मुगळी ता. चंदगड
  • शिवक्रांती विकास, सावर्डे ता. हातकणंगले
  • दत्त विकास, सावर्डे ता. हातकणंगले 

अपहार झालेल्या संस्थांची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई केलेली आहे. मुळात शेतकऱ्यांनी जागरुक राहून व्यवहार केला पाहिजे, चुकीचे आढळत असेल तर संबंधित निबंधक कार्यालयात कळवले पाहिजे. - प्रदीप मालगावे (सचिव, काेल्हापूर जिल्हा देखरेख संघ).

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी