शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

रिक्षाचालकाच्या मुलाची ‘आयआयटी’तून पीएच. डी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:15 PM

कोल्हापूर : येथील ऋणमुक्तेश्वर मंदिर परिसरातील कुंभार गल्लीमध्ये राहणाऱ्या अनिकेत वसंतराव कातवरे या युवकाने जिद्द, कष्ट आणि अभ्यासातील सातत्याच्या ...

कोल्हापूर : येथील ऋणमुक्तेश्वर मंदिर परिसरातील कुंभार गल्लीमध्ये राहणाऱ्या अनिकेत वसंतराव कातवरे या युवकाने जिद्द, कष्ट आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर आयआयटी, पवईतून पीएच. डी. पदवी मिळविली आहे. पीएच. डी. साठी त्याने पर्यावरणपूरक डांबराबाबत संशोधन केले आहे. या यशाद्वारे त्याने रिक्षाचालक असणारे त्याचे वडील आणि गृहिणी असणाºया आई अश्विनी यांच्या कष्टाचे सार्थक केले आहे.मध्यमवर्गीय कुटुंबातील अनिकेत याचे प्राथमिक शिक्षण शहरातील महानगरपालिकेच्या खर्डेकर विद्यालयात, तर माध्यमिक शिक्षण शाहू विद्यालयात झाले. बारावीनंतर त्याने सांगलीतील वालचंद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकी पदवी मिळविली. पुढे आयआयटी, खरगपूरमधून एम. टेक. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मुंबईतील आयआयटी पवईमध्ये पीएच. डी.चे संशोधन सुरू केले. सिव्हिल इंजिनिअरिंगमधील ट्रान्स्पोर्टेशन इंजिनिअरिंगमधून त्याने पीएच. डी. मिळविली. यासाठी त्याने रस्तेबांधणीसाठी उपयुक्त ठरणाºया पर्यावरणपूरक डांबरनिर्मितीबाबत संशोधन केले. डांबराची प्रत, त्याचे तापमान योग्य राखणे, ते वापरण्याचे प्रमाण, आदींची मांडणी त्याने या संशोधनात केली आहे. त्याला दि. ११ आॅगस्टमध्ये आयआयटी, पवईकडून पीएच. डी. प्रदान केली.शिक्षणात चांगल्या गुणांच्या जोरावर मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे महाविद्यालयीन ते पीएच. डी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.