शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

कोल्हापुरातील अवैध गर्भलिंग प्रकरण: मृत भ्रूण वेदगंगा नदीत फेकून लावली विल्हेवाट, संशयित डॉ. ढेंगेची कबुली 

By उद्धव गोडसे | Published: May 11, 2023 3:16 PM

अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर

उद्धव गोडसेकोल्हापूर : अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. राधानगरी पोलिसांच्या अटकेतील संशयित डॉ. प्रसाद शांताराम ढेंगे (वय ४२, रा. मडिलगे बुद्रूक, ता. भुदरगड) याने गर्भपातानंतर अनेक मृत भ्रूण वेदगंगा नदीत फेकल्याची कबुली दिली. पोर्टेबल सोनोग्राफी मशीन पुरवणारा ओंकार कराळे याच्यासह तीन संशयितांचा अजूनही पोलिसांकडून शोध सुरू आहे.राधानगरी पोलिसांनी गेल्या चार महिन्यात या गुन्ह्यात दोन पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, तीन दुचाकी, पाच मोबाइल, एक चारचाकी कार जप्त केली. तसेच एका बोगस डॉक्टरचा दवाखाना सील केला.पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे बेकायदेशीपणे गर्भलिंग निदान करणे आणि गर्भपात करणारे रॅकेट पोलिसांनी जानेवारी २०२३ मध्ये उघडकीस आणले. त्यानंतर राधानगरी आणि भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून, दोन्ही गुन्ह्यांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. राधानगरीत दाखल असलेल्या गुन्ह्यात एकूण २० संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत.त्यापैकी १७ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, त्यातील डॉ. प्रसाद ढेंगे याने अनेक मृत भ्रूण वेदगंगा नदीत फेकून त्यांची विल्हेवाट लावली. गर्भपातानंतर तो मृत भ्रूण प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवत होता. त्यानंतर गावाकडे जाताना नदीत फेकून देत होता. तीन भ्रूण नदीत फेकल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. डॉ. ढेंगे याने नेमके किती भ्रूण नदीत फेकले, याची अधिक चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

एजंट गाडेगोंडवाडीचायाच गुन्ह्यातील एजंट राजेंद्र हिंदुराव यादव (वय ४२, रा. गाडेगोंडवाडी, ता. करवीर) यालाही पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी केली. त्याने किती महिलांना डॉक्टरांपर्यंत पोहोचवले? त्यापैकी किती महिलांची गर्भलिंग निदान चाचणी आणि गर्भपात झाले, याची चौकशी सध्या सुरू आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी दिली.

तिघांचा शोध सुरूया गुन्ह्यातील संशयित स्वप्निल केरबा पाटील (रा. बालिंगा, ता. करवीर), ओंकार कराळे आणि सनी कुसाळे या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. स्वप्निल पाटील याने गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचे किट महिलांना पुरवल्याचे समोर आले आहे. ओंकार कराळे याने पोर्टेबल सोनोग्राफी मशीन उपलब्ध केले. त्यामुळे या दोघांच्या अटकेनंतर महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी