शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अवैद्य खैर वाहतूक करणारी टोळी वनविभागाच्या सापळ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 4:31 PM

Crime News Forest Department Kolhapur- कोते - मानेवाडी मार्गावरती एनारी ( ता. वैभववाडी ) येथील लाकूड व्यापाऱ्याला मध्यरात्री दोन वाजता म्हासूर्ली वनपाल व त्यांच्या टिमने अवैद्य खैर लाकडाची वाहतूक करताना पकडले.

ठळक मुद्देअवैद्य खैर वाहतूक करणारी टोळी वनविभागाच्या सापळ्यात !धामोड-मानेवाडी रोडवर पहाटे दोन वाजता कारवाई ; लाखाचा मुद्देमाल जप्त

श्रीकांत ऱ्हायकरधामोड :  कोते - मानेवाडी मार्गावरती एनारी ( ता. वैभववाडी ) येथील लाकूड व्यापाऱ्याला मध्यरात्री दोन वाजता म्हासूर्ली वनपाल व त्यांच्या टिमने अवैद्य खैर लाकडाची वाहतूक करताना पकडले.

मानेवाडी येथील एका वाहनचालकाला हाताशी धरून ही टोळी दुर्मीळ वनौषधीसह झाडांची चोरून वाहतुक करत असल्याची माहिती वनविभागाला आठवडाभरापूर्वी मिळाली होती. या माहितीवरून म्हासुर्ली वन विभाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्री हा सापळा लावला. त्यावेळी दोघा आरोपीसह एक लाख तीन हतार तीनशे सव्वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.केळोशी व म्हासुर्ली या संरक्षित वनामधुन विविध अशा दुर्मीळ वनौषधीसह कांही वृक्षांची कत्तल होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. यासाठी वैभववाडी तालुक्यातील एक टोळी स्थानिक लोकांना पैशाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढत होती. याची माहिती गोपनीय सुत्राकडून वन विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुरुवारी मध्यरात्री २ वाजता वनविभागाने सापळा रचून ही कारवाई केली.या कारवाईत मानेवाडी ( ता. राधानगरी) येथील लहू रामचंद्र माने या वाहनचालकाच्या महिंद्रा मार्शल  गाडीत बिगरपासचे खैर वनस्पतीचे लाकूड सापडले. या गाडीतील खैर वनस्पतीचे 1.00 घमी जळावू लाकूड मालासह वाहन जप्त करून ताबेत घेतले. प्रकरणी आरोपी लहू रामचंद्र माने (रा.कोते पैकी मानेवाडी) व  लाकूड मालक रामचंद्र साईल (रा.एनारी, ता. वैभववाडी) यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ कलम ४१(२) अनवंये प्रथम गुन्हा रिपोर्ट क्र टी१/२०२१ नुसार राशिवडे वनरक्षक उमा जाधव यांनी नोंदविला आहे.

ही कारवाई आर. एस.तिवडे, वनपाल म्हासुर्ली,  दिनेश टिपूगडे, वनरक्षक म्हासुर्ली, शिवाजी कांबळे, जोतिराम कवडे, संतोष करपे यांचेसह उमा जाधव यांच्या पथकाने केली. पुढील तपास आर. एस. तिवडे, वनपाल म्हासुर्ली हे वनक्षेत्रपाल एस. बी. बिरासदर यांचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत.फोटो ओळी =मानेवाडी -धामोड( ता. राधानगरी ) रोडवरती अवैद्य खैर वाहतुक करणाऱ्या वाहनचालक व व्यापाऱ्यांवरती कारवाई करताना वनपाल आर .एस. तिवडे , इतर कर्मचारी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर