कोल्हापूर : अवैध देशी-विदेशी मद्य विक्री करणार्या शिंगणापूर, कोथळी, पाचगाव या ठिकाणी छापे टाकून अवैधरित्या मद्य विक्री करणार्या तिघांना करवीर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून ३० हजारांचं मद्य साठा जप्त केला.पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्यात अवैध व्यवसाय कोणत्याही परिस्थितीत होता कामा नये. असे स्पष्टपणे सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. गुरुवारी रात्री करवीर पोलिस ठाण्यातील पथकांनी अवैध व्यवसायाविरुद्ध मोहीम सुरू केली. त्यानुसार करवीर तालुक्यातील पाचगाव येथील रुक्मिणीनगरात पोलिस उपअधीक्षक विक्रांत चव्हाण, विजय तळसकर, प्रमिला माने यांनी छापा टाकून १२ हजार रुपये किंमतीचं देशी-विदेशी मद्य जप्त केला. या छाप्यात स्वप्निल गोंगाणे याला अटक केली.
गुन्हेशोध पथकातील राजू हांडे, सुजय दावणे, राम माळी, अमित जाधव, सुहास पाटील, जालंदर पाटील यांच्या पथकानं शिंगणापूर येथील कमानीलगत असलेल्या रस्त्यावर अवैधरित्या विक्रीस आणलेलं देशी-विदेशी मद्य छापा टाकून ताब्यात घेतली.
यात विक्रेता संजय मोहितेला अटक केली. कोथळी गावातील माळवाडी येथे राहणार्या विजय बागडे याच्या घराशेजारील दारू अड्ड्यावर छापा टाकून ५ हजारांचं देशी-विदेशी आणि गावठी दारू हवालदार विजय भिवटे, दत्ता बांगर आणि वरूटे यांनी जप्त केली. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.