शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

इराणी खणीत सकाळी अकरा पर्यंत २१ गणेशमूर्तींचे विसर्जन

By सचिन भोसले | Published: September 09, 2022 12:31 PM

कोल्हापूर : उपनगरांसह शहरातील २१ फुटी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावाजवळील इराणी खण व त्याशेजारील खणीत शुक्रवारी सकाळी ...

कोल्हापूर :

उपनगरांसह शहरातील २१ फुटी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावाजवळील इराणी खण व त्याशेजारील खणीत शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत २१ हून अधिक लहान-मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. ते पाहण्यासाठी आबालवृद्धांनी दोन्ही खणींभोवती मोठी गर्दी केली होती.इराणी खणीत शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता हनुमान विकास मंडळाची सातफुटी  गणेशमूर्तींच्या विसर्जनाने सुरुवात झाली. त्यानंतर शिवसृष्टी मंडळ, वटवृक्ष कॉलनी, ब्लड ग्रुप, ना पस्टर तरुण मंडळ,

अमर तरुण मंडळ, मंगेशकर नगर तरुण मंडळ, त्रिमूर्ती तरुण मंडळ पाचगाव, कात्या यांनी  कॉम्प्लेक्स, जय शिवराय तरुण मंडळ, स्वयंभू तरुण मंडळ, ज्योतिबा रोड फुल व्यापारी मंडळ, शिवालय तरुण मंडळ, विवेकानंद मित्र मंडळ, डी बॉईज मित्र मंडळ, मनीषा नगर मित्र मंडळ, फ्रेंड्स मित्र मंडळ, शिवराज मंडळ, पटेल मित्र मंडळ, फायटर ग्रुप, राजाराम टिंबर मार्केट  या मंडळांच्या  २१ गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या.

पहिल्या टप्प्यात ढोल ताशांना पसंती ढोल-ताशाला अधिक पसंती मिरवणुकीत सकाळपासून अनेक मंडळांनी ढोल-ताशा, दोन स्टेरिओ बॉक्स, कर्णे, आदींना प्राधान्य दिले. या वाद्यांच्या ठेक्यावर ताल धरत अनेकांनी नृत्याचा आनंद लुटला.अशी यंत्रणागणेश मंडळांची संख्या लक्षात घेता महापालिकेने चार तराफे व दोन रबरी बोटींची सोय केली होती; तर मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेने तीन व दोन जे.सी.बी. यंत्रांची सोय केली होती.  शिवाजी पेठ विभागीय कार्यालयातील शेकडो महापालिका कर्मचारी कार्यरत आहेत. दोन्ही खणींच्या कडेने नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता महापालिकेने संरक्षक लोखंडी जाळ्या लावल्या होता; तर अग्निशमन दलाचे एक स्टेशन अधिकारी, एक तांडेल व कर्मचारी कार्यरत होते.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन