गडहिंग्लज :
मोठा भाऊ गेला, पाठोपाठ वडीलही गेले. त्यामुळे वयोवृद्ध आत्या व आईची जबाबदारी असणाऱ्या पंचविशीतील अमरला कर्करोगाने गाठले आहे. त्यामुळे त्याच्या दुर्दैवाचा फेरा संपता-संपेनासा झाला आहे.
अमर मल्लाप्पा नाईक हा गडहिंग्लज नगरपालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. त्याला रक्ताचा कर्करोग झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
दोन वर्षानपूर्वी त्याच्या मोठ्या भावाचे मेंदूच्या कर्करोगाने निधन झाले. त्यातून त्याचे कुटुंबीय सावरतेय, तोपर्यंत त्याच्या वडिलांचेही आकस्मिक निधन झाले. अमरची आई व आत्या रोज चार घरची धुणी-भांडी करून घर चालवितात. त्यांना हातभार लावण्यासाठी तो नगरपालिकेच्या कंत्राटी कामावर रोजंदारी करायचा; परंतु त्यालाही आता कर्करोगाने गाठले आहे.
कोरोनामुळे वर्षभर धुणी-भांडीचे कामेही नसल्याने त्याच्या कुटुंबाला जगण्याची चिंता लागली आहे. त्यातच अमरच्या उपचारासाठी सुमारे १० लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे त्याच्या आईला मोठा धक्का बसला आहे. तिला मानसिक आधाराबरोबरच आर्थिक मदत देण्यासाठी दानशूरांनी पुढे येण्याची गरज आहे.
------------------------
* अमरच्या वैद्यकीय उपचारासाठी १० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी सामाजिक संस्थांनी यथाशक्ती आर्थिक मदत करावी आणि घरेलू मोलकरणीच्या एकुलता उमद्या तरुण मुलाला जीवदान देण्यासाठी सहकार्य करावे.
- प्रा. स्वाती कोरी, नगराध्यक्षा, गडहिंग्लज.
------------------------
* अमर नाईक : २७०४२०२१-गड-०८