शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

उत्पन्नवाढीसाठी नवीन उपाययोजना राबवू

By admin | Published: April 03, 2017 12:39 AM

महापालिका : नूतन आयुक्त अभिजित चौधरी यांची ग्वाही; मूलभूत गरजांनाही प्राधान्य

तानाजी पोवार -- कोल्हापूर --नागरिकांच्या मूलभूत गरजांसह उद्यान, शहरातील वाहतुकीची समस्या या प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष देणार असून, महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठीही नवीन उपाययोजनांवर भर देणार असल्याची ग्वाही कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मावळते आयुक्त पी. शिवशंकर यांची परभणी येथे जिल्हाधिकारी पदावर बढतीवर बदली झाल्याने त्यांच्या जागी भंडारा येथील जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. ते रविवारी सायंकाळी कोल्हापुरात आले. डॉ. चौधरी हे आज, सोमवारी सकाळी १० वाजता कोल्हापूर महानगरपालिकेत येऊन ११ वाजता पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. कोल्हापूरला आपण प्रथमच आलो असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रथम कोल्हापूरचे प्रश्न प्राधान्याने समजावून घेणार आहे. कोल्हापूर शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने त्याचाही शहराच्या पर्यटनवाढीसाठी कसा वापर करता येईल, याकडेही प्राधान्याने पाहणार आहे. कोल्हापूरच्या नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर मी जास्तीत जास्त अभ्यास करून ते मी तातडीने सोडविण्यावर भर देणार आहे. शहरातील पाणीप्रश्न बऱ्यापैकी निकालात निघाल्याचे समजते. तरीही त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू देणार नाही. मावळते आयुक्त पी. शिवशंकर हे माझेच बॅचमेंट असल्याने त्यांनी बऱ्यापैकी कोल्हापूरची ओळख कागदोपत्री करून दिली आहे. त्यांनी राबविलेल्या योजना आणखी ह्यापुढे चालूच ठेवणार आहे. यांना देणार प्राधान्य...शहरातील वातावरण प्रदूषणविरहित राहावे. वृद्ध, बालकांसाठी उद्याने विकसित करण्याचाही विचार आहे. त्यामुळे धकाधकीच्या वातावरणातही विरंगुळा घेता येईल. नागरिकांना आॅनलाईनने जन्म, मृत्यू दाखले देण्याची सुविधा प्राधान्याने राबविण्याचा विचार आहे. डॉ. चौधरी हे जळगाव जिल्ह्यातील असून २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. औरंगाबादला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी दोन वर्षे काम केले आहे. भंडारा येथे ते जिल्हाधिकारी होते. ते एम.बी.बी.एस. आहेत.