लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचारी हे सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी आणि त्यापासून मिळणाºया लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यापीठाच्या प्रशासनाने याबाबत लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचाºयांतून होत आहे.एकाच पदावर सलग २४ वर्षे काम केलेल्या; परंतु पदोन्नती न मिळू शकल्याने निर्माण झालेली कुंठितता घालविण्यासाठी सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना शासनाने लागू केली. ही योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली असली, तरी आदेशाच्या दिनांकाला जे सेवेत कार्यरत आहेत, त्यांनाच या योजनेचे लाभ अनुज्ञेय करण्याचा निर्णय घेतलेला आहे.यानुसार दि. १ आॅक्टोबर २००६ ते ३१ मार्च २०१० या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाºयांना हा लाभ अनुज्ञेय नव्हता. आता सुधारित नव्या आदेशानुसार संबंधित कर्मचाºयांना या योजनेअंतर्गत दुसरा लाभ अनुज्ञेय झाला आहे. नवा आदेश दि. ९ डिसेंबर २०१६ रोजी निर्गमित झाला आहे. हा आदेश शिवाजी विद्यापीठास लागू आहे.सन २००६ पासून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना हा लाभ अनुज्ञेय आहे. आजपर्यंतचा कालावधी बघता हा निर्णय त्वरित लागू होणे गरजेचे आहे, अशी मागणी काही सेवानिवृत्तांनी अर्जाद्वारे केली आहे. मात्र, अद्यापही कार्यवाही झालेली नाही. कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी विद्यापीठ सेवक संघाच्या शिष्टमंडळाला प्रशासनाने आज, शुक्रवारी चर्चेसाठी बोलविले आहे. यामध्ये ‘आश्वासित प्रगती’ योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा व्हावी, अशी मागणी संंबंधित सेवानिवृत्त कर्मचाºयांकडून होत आहे.सुधारित शासकीय आदेश लागू होऊन आठ महिने पूर्ण होत आले, तरी अद्यापही या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाकडून कार्यवाही झालेली नाही. विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याची सेवानिवृत्त कर्मचाºयांची मागणी आहे.- प्रभाकर भोसले,सेवानिवृत्त कर्मचारी, शिवाजी विद्यापीठ
‘आश्वासित प्रगती’ची अंमलबजावणी कधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:32 AM