शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
3
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
4
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
5
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
6
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
7
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
8
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
9
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
10
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
11
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
12
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
13
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
14
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
15
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
16
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
17
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
18
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
19
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
20
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

दुष्काळावर उपाययोजना राबवाव्यात

By admin | Published: April 18, 2016 12:08 AM

के. पी. विश्वनाथ : माजी विद्यार्थ्यांचा ‘कृषी संगम’ उत्साहात; शेती, शेतकऱ्यांच्या विकासासाठी योगदान द्या

कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थिती डोळ्यांसमोर ठेवून कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत; पण त्याबरोबर कृषी पदवीधर, निवृत्त अधिकाऱ्यांनी दुष्काळावर उपाययोजनांवर आधारित विशेष कार्यक्रम हाती घ्यावेत. हवामान, पाऊस यानुसार शेती उत्पादन घेण्याचे व शेती उत्पादनाला बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर माजी विद्यार्थी संघटनेने भर द्यावा, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. के. पी. विश्वनाथ यांनी रविवारी येथे केले.कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित ‘कृषी संगम २०१६’ या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकॉकमधील एशिया पॅसिफिक असोसिएशन अ‍ॅग़्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूशनचे कार्यकारी सचिव डॉ. रघुनाथ घोडके, तर माजी प्राचार्य एम. डी. जांभळे, प्राचार्य गजानन खोत, प्राचार्य अरुण मराठे प्रमुख उपस्थित होते.डॉ. विश्वनाथ म्हणाले, कृषी महाविद्यालयाचे मूळ उद्दिष्ट शेतकऱ्यांचे हिताचे रक्षण करणे असल्याने कृषी पदवीधर व निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सक्रिय योगदान द्यावे. कृषी पदवीधर माजी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर द्या. शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरणाऱ्या कार्यक्रमांच्या योजना तयार करा. त्यांना प्रोत्साहन द्यावे. शिवाय संघटनेने स्वत:चा एनजीओ अथवा फोरम निर्माण करून महाविद्यालयास शेतकऱ्यांना मदत करावी. डॉ. घोडके म्हणाले, शेतकऱ्यांसाठी माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय योगदान द्यावे. याअंतर्गत त्यांनी विविध योजना कार्यान्वित कराव्यात. उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी माजी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. या मेळाव्यात १९६३ ते २०१२ पर्यंतच्या प्रत्येक बॅचमधील दोन विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार, आदींसह राज्यभरातील सुमारे दीड हजार माजी विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष एम. डी. जांभळे यांनी प्रास्ताविकात ‘व्हिजन २०३०’चे नियोजन करण्याची सूचना केली. उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व कॅप्टन उत्तम पाटील यांनी संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 'आत्मा'च्या येथील प्रकल्प उपसंचालक भाग्यश्री पवार-फरांदे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)दोन वर्षांनी होणार ‘कृषी संगम’दर दोन वर्षांनी ‘कृषी संगम’ घेण्याचे मेळाव्यात निश्चित झाले. संघटनेतर्फे महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना मदत करणे. महाविद्यालयाचा स्थापना दिन साजरा करणे. संघटनेने कृषी क्षेत्रासह महाविद्यालयाच्या विकासासाठी ‘थिंक टँक’ म्हणून काम करणे. कृषी मेळावा घेणे. कृषी विषयक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, आदी ठराव मेळाव्यात एकमताने हात उंचावून मंजूर करण्यात आले. शेतकऱ्यांच्या ऋणातून मुक्त व्हामेळाव्यात पुण्याच्या क्रीडा विभागाचे संचालक राजाराम माने यांनी दुष्काळग्रस्तांसाठी दहा हजार रुपयांचा निधी दिला; शिवाय माजी विद्यार्थ्यांनी आपल्यापरीने आर्थिक योगदान देऊन शेतकऱ्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचे आवाहन केले.