कोल्हापूर : जिम्नॅस्टिक्स हा खेळ सर्व खेळांचा पाया आहे. त्यामुळे फुटबाॅल, क्रिकेट अशा विविध खेळांबरोबर हा खेळही महत्त्वाचा आहे, असे मत के. एस. ए. चे अध्यक्ष मालोजीराजे यांनी गुरुवारी व्यक्त केले. शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त के. एस. ए. जिम्नॅस्टिक्स विभागात नवीन साहित्य प्रदान समारंभप्रसंगी ते बोलत होते.
मालोजीराजे म्हणाले, फुटबाॅल, क्रिकेट या खेळांसोबत के. एस. ए. ने जिम्नॅस्टिक खेळाकडे अधिक लक्ष दिले आहे. त्यामुळेच या केंद्रात नवे बॅलेन्सिंग बीम, वाॅल्टिंग टेबल, पॅरललबार, रोनरिंग या राष्ट्रीय स्पर्धेला उपयुक्त असे अडीच लाख किमतीचे साहित्य आणण्यात आले आहे. त्याच्या वापरामुळे या केंद्रातील खेळाडूंची राज्य, राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी निश्चितपणे चमकदार होईल. असे खेळाडू घडविण्यासाठी के. एस. ए व पदाधिकारी केंद्रातील जिम्नॅस्टिक्सपटूंच्या मागे खंबीरपणे उभे राहतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यानिमित्त राष्ट्रीय खेळाडू प्रतीक माने याने प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी मानद सरचिटणीस माणिक मंडलिक यांनी स्वागत केले. यावेळी उपाध्यक्ष दीपक शेळके, नंदकुमार बामणे, दिग्विजय भोसले, प्रा. अमर सासने, मनोज जाधव, संग्राम यादव, संभाजीराव पाटील-मांगोरे, प्रशिक्षक संजय तोरस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : ०७०१२०२१-कोल-केएसए०१
ओळी : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या जिम्नॅस्टिक्स केंद्रात नवीन साहित्य प्रदान गुरुवारी संस्थेचे अध्यक्ष मालोजीराजे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अमर सासने, दिग्विजय भोसले, माणिक मंडलिक, दीपक शेळके, संजय तोरस्कर, संभाजीराव पाटील, मांगोरे, नंदकुमार बामणे, मनोज जाधव आदी उपस्थित होते.
फोटो : ०७०१२०२१-कोल-केएसए०१
ओळी : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या जिम्नॅस्टिक्स केंद्रात नवीन साहित्य प्रदानप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्सपटू प्रतीक माने याने पॅरलल बारचे प्रात्यक्षिक सादर केले.
(छाया : नसीर अत्तार)