कोल्हापूर : बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांच्या कार्यालयांतर्गत येणाऱ्या बीट क्रमांक चारच्यावतीने पोषण आहार सप्ताहानिमित्त पोषण पालखीचे आयोजन करून लेझीम खेळाद्वारे पोषण व पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी निवेदिता महाडिक उपस्थित होत्या. बालाजी पार्क येथे हा कार्यक्रम झाला.
यावेळी गरोदर व स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांच्यासाठी पौष्टिक पाककृती स्पर्धा घेण्यात आली. तसेच कुपोषणाच्या समस्येवर लक्ष केंद्रीत करणारी पालकांची प्रश्नमंजुषा स्पर्धाही घेण्यात आली. प्रास्ताविक मुख्य सेविका नंदा पाटील यांनी केले तर सेविका रेखा काटकर यांनी आभार मानले. यावेळी धनेश्वर बागुल, विमल गवळी, सुनीता घोडके, शीतल मराठे, शाळा नंबर तीसच्या मुख्याध्यापिका शकुंतला मोरे, सरिता पवार, सामाजिक कार्यकर्ते अतुल पाटील, शिवाजी मोरे आदी उपस्थित होते.
२३०९२०२१-कोल पोषण सप्ताह
कोल्हापुरातील बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांच्या कार्यालयांतर्गत पोषण आहार सप्ताहानिमित्त पौष्टिक अन्नपदार्थ करण्याच्या स्पर्धा झाल्या.