कोल्हापूर: जिल्ह्यातील सहकार आणि पोलिस प्रशासनाने तक्रार असणाऱ्या अवैध सावकारांवर गुरुवारी छापे टाकून झाडाझडती घेतली. यात कोल्हापूर शहर, मुरगुड, राधानगरी, भूदरगडमधील १२ सावकारांचा समावेश आहे. १६ पथकांनी एकाच वेळी केलेल्या या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.खासगी सावकारीला कांही नियम अटी घालून सहकार विभागाने मान्यता दिली आहे. पण परवाना नसताना अवैधरित्या सावकारी होत असल्याच्या आणि जाणिवपुर्वक कर्जदारांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी सहकार विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अतिशय गुप्तता पाळून सहकार विभागाने गुरुवारी पोलिसांच्या मदतीने एकाच वेळी छापे टाकले.
त्यासाठी १६ पथके तयार करण्यात आली होती.यात ४८ पोलिस, ५ पोलिस अधिकारी आणि सहकारचे १३ अधिकारी व कर्मचारी असे ५0 जणांचा या पथकात समावेश होता, अशी माहिती सहकारचे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी सांगितले.