शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कोल्हापूर पोलिसांची प्रतिमा सुधारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2017 12:55 AM

संजय मोहिते : पारदर्शक सेवा देणार; अवैध व्यवसाय शंभर टक्केबंद करणार

कोल्हापूर : कोल्हापूरच्या नागरिकांना अत्यंत पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीची पोलीस सेवा देणे हे माझे कर्तव्य राहील. पोलीस यंत्रणेची प्रतिमा सुधारली जाईल. जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग पोलिसांच्या कार्यात घेऊन कोल्हापूर जिल्हा अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न राहतील. येथील अवैध व्यवसाय शंभर टक्के बंद केले जातील. दिवसाचे २४ तासमाझ्या मातीला व कोल्हापूरच्या जनतेला वाहून देण्यासाठी मी येथे आलो आहे, अशी ग्वाही नूतन पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली. मंगळवारी त्यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे तत्कालीन पोलीस अधीक्षक एम. बी. तांबडे यांच्याकडून स्वीकारली. राज्य व भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक, उपायुक्त संवर्गातील १०४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाने गुरुवारी (दि. २७) काढले. त्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक एम. बी. तांबडे यांची पदोन्नतीवर सोलापूर पोलीस आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागी मुंबई शहराचे पोलीस उपायुक्त संजय मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली. मोहिते यांनी मावळते पोलीस अधीक्षक तांबडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर मोहिते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘कोल्हापूर पोलीस प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला असता येथील पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी आपला सर्वतोपरी प्रयत्न राहील. तांबडे यांनी कमी वेळेत चांगले काम करून दाखविले आहे. तेच काम पुढे चांगल्या प्रकारे चालविण्याचा आपला प्रयत्न असेल. हातागाड्यांवरील कामगारांच्या पैशांच्या करांतून आम्ही पगार घेतो, त्यामुळे नागरिकांना पारदर्शक पोलीस सेवा देण्याचा प्रयत्न राहील. तक्रार अर्ज, दाखले, पासपोर्ट, वाहतूक समस्या यांमध्ये नागरिकांना कुठेही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. जिल्ह्णातील अवैध धंदे बंद करणार का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, अवैध धंदे हे शंभर टक्के बंदच राहतील. मटका, जुगार, क्लब, दारू अड्ड्यांवर छापे टाकले म्हणून पोलिसांची जबाबदारी संपली नाही. तर त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे. राजकीय दबावाखाली काम न करता गुन्हेगारी प्रवृत्तींना कायद्याने कायदा शिकविला जाईल. वर्चस्ववाद, पूर्ववैमनस्य, अनैतिक संबंध, आदी कारणांतून खुनाचे प्रमाण वाढत आहे, ते कमी कसे करता येईल, यावर आपला भर राहील, असे मोहिते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कोल्हापूर पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे संजय मोहिते यांनी मंगळवारी मावळते पोलीस अधीक्षक एम. बी. तांबडे यांच्याकडून स्वीकारली.