शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

Kolhapur Politics: हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पुन्हा माने विरुद्ध शेट्टीच

By विश्वास पाटील | Published: March 01, 2024 11:53 AM

महाविकास आघाडी शेट्टी यांना बाय देण्याच्या स्थितीत 

विश्वास पाटीलकोल्हापूर : पक्ष, चिन्ह कोणतेही असले, तरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने विरुद्ध माजी खासदार राजू शेट्टी या गतवेळच्या पैलवानांमध्येच पुन्हा लोकसभेची कुस्ती होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीकडून लढावे अशी ऑफर असली तरी शेट्टी मात्र ‘एकला चलो रे..’ या भूमिकेवर ठाम आहेत. तीच भूमिका घेऊन मतदारांसमोर जाण्याची त्यांची योजना आहे. त्यामुळे महाविकास आघाडी या मतदारसंघात त्यांना ‘बाय’ देण्याच्या मनस्थितीत आहे. खासदार माने यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असून त्यांच्याऐवजी ही उमेदवारी राहुल आवाडे यांना मिळावी, असा प्रयत्न आवाडे गटाकडून सुरू असला, तरी तसे काही घडण्याची शक्यता धूसर वाटते.

या मतदारसंघातून शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून खासदार माने यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ यापूर्वी भाजपकडे होता. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास भाजपला प्रतिनिधित्व मिळत नाही. त्यामुळे उमेदवार शिंदे शिवसेनेचे ठेवून एक जागा कमळ चिन्हावर लढावी, असा आग्रह भाजपकडून सुरू आहे. हा मतदारसंघ यापूर्वी दोनवेळा भाजपने लढवला आहे. त्यावेळी राज्याच्या राजकारणात भाजप फारसा प्रभावी नसतानाही त्यांच्या उमेदवारांनी चांगली मते घेतली आहेत. त्यामुळे खासदार माने यांनी कमळ चिन्हावर लढावे, असा पर्याय येऊ शकतो. स्वत: माने यांनाही त्यातच जास्त रस आहे; परंतु या वाटणीत शिंदे शिवसेनेची एक जागा कमी होते म्हणून ते कितपत तयार होतात यावरच चिन्ह बदलाचा निर्णय होईल.या मतदारसंघात शेट्टी यांच्या संघटनेचा व भाजपचा एकही आमदार नाही. शिंदे शिवसेनेचा एक आमदार आहे. महाविकास आघाडी व महायुतीकडे प्रत्येकी तीन आमदार आहेत. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांचे नाव चर्चेत आले होते. त्यांनी काही गावांत संपर्क मोहीमही राबविली होती; परंतु ती नंतर थांबवली. त्यामुळे महाविकास आघाडीचा स्वतंत्र उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता वाटत नाही. शेट्टी यांच्या उमेदवारीस मुख्यत: शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा जास्त आहे. कारण माने यांचा पराभव हे त्यांचे टार्गेट आहे.शेट्टी स्वतंत्र लढले तरी ते भाजपच्याच विरोधात लढत असल्याने त्यांना विरोध करू नये. त्यांच्या संघटनेच्या ताकदीचा अन्य काही मतदारसंघांतही फायदा होऊ शकतो, असे गणित त्यामागे आहे. राहुल आवाडे यांनीही लढण्याची तयारी केली आहे; परंतु ते आवाडे गट जणू ताराराणी आघाडीचे अस्तित्व ठेवून राजकारण करीत आहे. त्यांनी भाजपमध्ये अजून प्रवेशच केलेला नसल्याने ते कोणत्या तोंडाने पक्षाकडे उमेदवारी मागतात, अशी विचारणा भाजपमधील नेतेच करीत आहेत. इचलकरंजीच्या स्थानिक राजकारणात आवाडे व भाजपचे सुरेश हाळवणकर यांच्यात फारसे सख्य नाही. तीच स्थिती खासदार माने व आवाडे यांच्यातील संबंधाची आहे. आमदार प्रकाश आवाडे यांचा लोक उमेदवार बदला म्हणतात, असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ गेल्याच आठवड्यात व्हायरल झाला होता.

मतदार संघ : पुरुष : स्त्री : एकूण मतदारशाहूवाडी - १५१४०४ : १४१२४४ : २९२६५१हातकणंगले - १६८२७७ : १६००४० : ३२८३१७इचलकरंजी - १५२३७० : १४४५४८ : २९६९१८शिरोळ : १५६७९५ : १५६०९९ : ३१२८९४इस्लामपूर : १३६८७४ : १३२२३३ : २६९११०शिराळा : १५१६२४ : १४३८८२ : २९५५१०एकूण : ९,१७,३४४ : ८७८,०३७ : १७९५३८१

विधानसभानिहाय बलाबल

  • राष्ट्रवादी काँग्रेस : ०२
  • काँग्रेस : ०१
  • शिवसेना शिंदे गट : ०१
  • जनसुराज्य व भाजप सहयोगी : ०१
  • अपक्ष व भाजप सहयोगी : ०१

गेल्या निवडणुकीतील की फॅक्टर

  • ‘एक मराठा, लाख मराठा’ची हवा
  • माने यांचे वक्तृत्व व नव्या नेतृत्वाचा प्रभाव
  • राजू शेट्टी कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचे नकारात्मक वातावरण
  • इचलकरंजीच्या पाणीप्रश्नी काय केले नसल्याचा प्रचार
  • वंचितच्या उमेदवारांनी घेतलेली लाखावर मते

 

  • गेल्या निवडणुकीतील खासदार माने यांचे मताधिक्य : ९६०३९
  • विधानसभेच्या इचलकरंजी, शाहूवाडी आणि हातकणंगले मतदारसंघात खासदार माने यांना मताधिक्य
  • विधानसभेच्या शिरोळ, इस्लामपूर, शिराळा मतदारसंघात राजू शेट्टी यांना मताधिक्य.
  • माने यांना सर्वाधिक मताधिक्य ७४९३० इचलकरंजीने दिले.
  • शेट्टी यांना सर्वाधिक मताधिक्य २१०४२ शिराळ्याने दिले.

अशी झाली लाट..राजू शेट्टी यांचे २०१४ च्या निवडणुकीतील मताधिक्य १७७८१० होते. ते फेडून खासदार माने यांनी नव्याने ९६०३९ मताधिक्य मिळवले एवढी लाट गेल्या निवडणुकीत शेट्टी यांच्याविरोधात उसळली होती. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाRaju Shettyराजू शेट्टीShiv Senaशिवसेना