Kolhapur North By Election: चंद्रकांत पाटील म्हणाले, सतेज पाटील यांना सांगितलंय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 06:31 PM2022-03-18T18:31:37+5:302022-03-18T18:37:19+5:30

सतेज पाटील देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे सांगितल्यावर पाटील म्हणाले, या निवडणुकीबाबत आमची चर्चा झाली आहे. राज्यपातळीवर एकदा देवेंद्र फडणवीस आणि मी ठरविल्यानंतर त्यात बदल नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं.

In Mumbai, Guardian Minister Satej Patil met Chandrakant Patil regarding holding of Kolhapur North by election without any objection. | Kolhapur North By Election: चंद्रकांत पाटील म्हणाले, सतेज पाटील यांना सांगितलंय

Kolhapur North By Election: चंद्रकांत पाटील म्हणाले, सतेज पाटील यांना सांगितलंय

Next

कोल्हापूर : विधान परिषदेप्रमाणे ‘उत्तर’ची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव घेऊन मुंबईत पालकमंत्री सतेज पाटील भेटले. परंतु विधान परिषदेवेळी आम्हाला तीन जागा बिनविरोध करायच्या होत्या. त्यामुळे आम्ही तयार झालो. आता तशी परिस्थिती नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप ही निवडणूक लढवणार असल्याचे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज, शुक्रवारी कोल्हापुरात बोलताना सांगितले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांना भाजप उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी आम्ही सत्यजित कदम आणि महेश जाधव या दोघांची नावे दिल्लीला पाठविली आहेत. त्यातील आमचे पसंतीचे नाव म्हणून कदम यांच्या नावाची आम्ही शिफारस केली आहे; परंतु अधिकृत निर्णय दिल्लीतच होणार आहे. उशीर झाला तरी उद्या सकाळपर्यंत निर्णय होईल असे सांगितले.

ते म्हणाले, बिनविरोध त्याचवेळी होईल. जेव्हा जयश्री जाधव या भाजपच्या चिन्हावर लढतील आणि दोन्ही काँग्रेस पाठिंबा देतील. सतेज पाटील देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे सांगितल्यावर पाटील म्हणाले, या निवडणुकीबाबत आमची चर्चा झाली आहे. राज्यपातळीवर एकदा देवेंद्र फडणवीस आणि मी ठरविल्यानंतर त्यात बदल नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं.

कोणत्या विषयावर निवडणूक लढवणार, असे विचारल्यानंतर पाटील म्हणाले, खूप विषय आहेत. अनेक वर्षे डोक्यावर बसला असता तो टोल आम्ही घालवला आहे. तीर्थक्षेत्रासाठी कोट्यवधी रुपयांचा आराखडा करून निधी देण्यास सुरुवात केली; परंतु महाविकास आघाडीला तो पुढे देता आला नाही. महापालिकेत यांनी पाच वर्षांत दाखवण्याजोगं काय काम केलं, भूखंडाच्या भ्रष्टाचाराही मुद्दा यात येणार आहे. राजू शेट्टी भाजपसोबत येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Web Title: In Mumbai, Guardian Minister Satej Patil met Chandrakant Patil regarding holding of Kolhapur North by election without any objection.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.