शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

सात महिन्यांत कोल्हापूरच्या १४४ विद्यार्थ्यांना मिळाले ‘सारथी’चे बळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 1:11 PM

स्पर्धा परीक्षा, पीएच.डी. करण्यासाठी त्यांना ‘सारथी’ने मार्गदर्शनासह विद्यावेतनाद्वारे मदतीचा हात

संतोष मिठारीकोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेच्या कोल्हापुरातील उपकेंद्राचे कामकाज गेल्या सात महिन्यांपूर्वी सुरू झाले. त्यानंतर आतापर्यंत या केंद्राच्या माध्यमातून येथील मराठा समाजातील १४४ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ मिळाले. स्पर्धा परीक्षा, पीएच.डी. करण्यासाठी त्यांना ‘सारथी’ने मार्गदर्शनासह विद्यावेतनाद्वारे मदतीचा हात दिला. जिल्ह्यातील १८० विद्यार्थ्यांनी या केंद्राला भेट देऊन विविध योजनांची माहिती जाणून घेतली.

‘सारथी’कडून यूपीएससी, एमपीएससीची पूर्व आणि मुख्य परीक्षा, पोलीस भरती आदींबाबत ऑनलाइन प्रशिक्षण, मार्गदर्शन केले जाते. एम.फिल., पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन अधिछात्रवृत्ती योजना राबविली जाते. त्यामध्ये एम. फिल.साठी दरमहा ३१ हजार, तर पीएच.डी.साठी ३५ हजार रुपये दिले जातात. शिवाजी विद्यापीठांतर्गत पीएच.डी. करणाऱ्या ८३ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात येत आहे.एमपीएससी मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या ५७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. यूपीएससीची तयारी करणाऱ्या चार विद्यार्थ्यांना (त्यातील पुण्यात प्रशिक्षण घेणाऱ्यांना दरमहा नऊ हजार, तर दिल्लीत प्रशिक्षण घेणाऱ्यांना १३ हजार रुपये) आर्थिक मदत देण्यात येत आहे. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘एनएमएमएस’ (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक) शिष्यवृत्ती अंतर्गत दरमहा आठशे रुपये दिले जातात. यंदा या शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यातील ४०९५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे.

विद्यार्थ्यांना सातत्याने माहिती

या उपकेंद्रात सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यांची नोंदणी करून घेतली जाते. ‘सारथी’च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची या विद्यार्थ्यांना सातत्याने माहिती दिली जाते.

रोजगार संधीसाठी प्रशिक्षण

याव्यतिरिक्त लक्षित गटातील युवक, युवतींसाठी उद्यमशीलता विकसित करण्यासाठी कृषिपूरक, औद्योगिक क्षेत्रातील रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्याची प्रक्रिया ‘सारथी’कडून सुरू आहे.

विविध योजनांबाबतची कागदपत्रे सादर करण्यासाठी सध्या विद्यार्थ्यांना पुणे येथे जावे लागते. ही कागदपत्रे कोल्हापुरातील उपकेंद्रात स्वीकारण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येईल. या केंद्रासाठी पुरेसे कर्मचाऱ्यांची शासनाकडून लवकर नियुक्ती होईल. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. - अशोक पाटील, निबंधक, सारथी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थी