शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

शिरोलीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी संतप्त जमावाची शाळेवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 2:13 PM

आर्यनला शाळेचे अध्यक्ष गणपती पाटील यांनी आजोबा रामचंद्र बुडकर यांच्या समोर अपमानास्पद भाषा वापरून तुला शाळेतून काढून टाकतो तू सोमवार पासून शाळेत येऊ नकोस असे बोलले. यामुळे निराश झालेल्या आर्यनने गळफास घेऊन आत्महत्या केली.

शिरोली : शिरोली येथील आर्यन हेरंभ बुडकर (वय-१५) या शाळकरी मुलाच्या आत्महत्या प्रकरणी आज, सोमवारी सकाळी अकरा वाजता गावकऱ्यांनी गावातून मुकमोर्चा काढला. हा मोर्चा सिमबॉलीक इंटरनॅशनल स्कूलवर जावून धडकल्यावर   शाळेचे अध्यक्ष गणपती जनार्दन पाटील आणि प्राचार्या गिता गणपती पाटील यांचा निषेध करत संतप्त जमावाने शाळेवर दगडफेक केली.याप्रकरणी दोषींना २४ तासात अटक केली नाही तर शिरोली पोलीस ठाण्याच्यावर मोर्चा काढणार असल्याचे सरपंच शशिकांत खवरे यांनी सांगितले. या मोर्चात गावातील सुमारे पाच हजारहून अधिक लोक सहभागी झाले होते.आर्यन हा शिरोली येथील सिमबाॅलीक इंटरनॅशनल स्कूल मध्ये दहावीच्या वर्गात शिकत होता. शुक्रवारी (दि.१) सायंकाळी शाळेत फुटबॉल खेळत असताना त्याने मारलेला बॉल चुकुन एका विद्यार्थीनींला लागला. यावरुन आर्यनला शाळेचे अध्यक्ष गणपती पाटील यांनी आजोबा रामचंद्र बुडकर यांच्या समोर अपमानास्पद भाषा वापरून तुला शाळेतून काढून टाकतो तू सोमवार पासून शाळेत येऊ नकोस असे बोलले. यामुळे निराश झालेल्या आर्यनने गळफास घेऊन आत्महत्या केली.आर्यन बुडकर याच्या मृत्युला शाळेचे अध्यक्ष आणि प्राचार्य जबाबदार आहेत. त्यांच्या  विरोधात गुन्हा नोंद होवून तीन दिवस उलटून गेले. पण त्यांना अजून अटक झालेली नाही. ते फरारी आहेत असे पोलीस सांगतात. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या कामावरच शंका उपस्थितीत केली. गुढीपाडव्याच्या दिवशी गणपती पाटील आणि गिता पाटील हे घरीच होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक का केली नाही असा सवाल ही आंदोलकांनी केला.शाळेच्या आवारात आर्यनच्या श्रद्धांजलीचा डिजिटल फलक लावण्यात आला होता. तो फलक ही काढा आमच्या मुलाच्या आत्महत्येसकारणीभूत असणाऱ्यांनी आर्यनचा फलक लावू नये असा पवित्रा महिलांनी घेतला. यानंतर फलक उतरविण्यात आला. आंदोलनात शाळा बंद करा, आर्यनच्या मारेकऱ्यांना अटक करा,आर्यनला न्याय द्या,सिमबाॅलीक स्कूलचा निषेध,पालकांनो आपला पाल्य योग्य शाळेत घाला, असे फलक घेऊन लोक आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी सरपंच शशिकांत खवरे यांनी २४ तासात शाळेचे अध्यक्ष गणपती पाटील आणि गिता पाटील यांना पोलिसांनी अटक केली नाही तर पुढील आंदोलन पोलीस ठाण्याच्या आवारात करणार असल्याचे सांगितले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करतो असे आंदोलकांना आश्वासन दिले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.या आंदोलनात सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, महेश चव्हाण, बाजीराव पाटील, प्रकाश कौंदाडे,माजी उपसरपंच कृष्णात करपे, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, सरदार मुल्ला, जोतिराम पोर्लेकर, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, मन्सूर नदाफ, प्रशांत कागले, सचिन गायकवाड, हिम्मत सर्जेखान, प्रल्हाद खोत, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थी