शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

देशांतर्गत बाजारपेठेत दूध पावडर, बटरने घेतली उसळी, दूध उत्पादकांना येणार अच्छे दिन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 2:35 PM

दुधाची मागणी वाढत जाईल, तशी दरात आणखी १० ते १५ टक्के वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

राजाराम लोंढे

कोल्हापूर : जगात दरवर्षी दुधाच्या उत्पादनात किमान २ ते ३ टक्के वाढ होत असते. मात्र, यंदा परिस्थिती उलटी झाली असून, १० टक्के दूध घटल्याने संपूर्ण जगात दूध टंचाई भासत आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत दूध पावडर व बटरने एकदम उसळी घेतली असून, किलोमागे शंभर रुपयांची वाढ झाली आहे. आता उन्हाळा सुरू झाला असून, दुधाची मागणी वाढत जाईल, तशी दरात आणखी १० ते १५ टक्के वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

जगात सर्वाधिक दूध उत्पादन भारतात होते. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क हे देश पुढे आहेत. गेली दोन वर्षे कोरोनामुळे संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटली आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे दुधाची मागणी कमी झाली आणि दूध अतिरिक्त होऊ लागले. त्याचा परिणामी दूध उत्पादनावर झाला.

आता जगभरातील मार्केट पुन्हा खुले झाल्याने दुधाची मागणी वाढली आहे. त्यात सर्वच दूध उत्पादन करणाऱ्या देशात यंदा १० टक्क्यांनी उत्पादन घटले आहे. त्याचा परिणाम मार्केटवर दिसत असून, गाय दूध पावडरचे दर २९० रुपये किलो तर बटर ३९५ रुपये किलोपर्यंत पाेहोचले आहे. साधारणत: डिसेंबरनंतर ४० ते ५० टक्के दरवाढ झाली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने सगळीकडेच दुधाची मागणी वाढणार आहे. त्यापटीत दूध उपलब्ध नसल्याने दरात किमान १० ते १५ टक्के वाढ होणार, हे निश्चित आहे.

युक्रेन, रशिया युध्दाचाही परिणामयुक्रेनमधून दूध पावडर, बटरचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते, त्यामुळे युक्रेनमधून दुबईसह इतर देशात उपपदार्थ आयात होतात. मात्र, युध्दामुळे तेथील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाल्याने पावडरसह इतर उपपदार्थांच्या दरावर परिणाम झाला आहे.

म्हशीपेक्षा गाय बटरला जादा दर

जगभरात गायीच्या दुधाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे म्हैस बटरपेक्षा किलोमागे दहा रुपये जादा दर गाय बटरला मिळत आहे.

न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया ठरवतात मार्केटजगात लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक दूध उत्पादन न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्कमध्ये होेते. येथील प्रति माणसी दुधाचे उत्पादन भारताच्या चौपट आहे. त्यामुळे हे तीन देशच दुधाचे मार्केट ठरवत असतात.

दूध उत्पादकांना येणार अच्छे दिन

दुधाच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार येतात. एकीकडे पशुखाद्याचे दर वाढ असतानाच दुधाला तेवढा भाव मिळत नाही. मात्र, आता किमान लिटरमागे दोन ते तीन रुपयांची वाढ होणार असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूध