शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

विधानसभेचे राजकारण: कोल्हापूर जिल्ह्यात एकमेकांशी सर्वाधिक वेळा भिडले 'हे' नेते 

By राजाराम लोंढे | Published: November 04, 2024 6:52 PM

राजाराम लोंढे कोल्हापूर : विधानसभेच्या आतापर्यंतच्या निवडणुकीत सर्वाधिक सहा वेळा स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंह घाटगे, तर पालकमंत्री हसन ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : विधानसभेच्या आतापर्यंतच्या निवडणुकीत सर्वाधिक सहा वेळा स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंह घाटगे, तर पालकमंत्री हसन मुश्रीफ व संजय घाटगे यांच्यात समोरासमोर लढाई झाली. माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील व नरसिंगराव पाटील यांच्यात पाच वेळा, तर आमदार विनय कोरे व सत्यजीत पाटील सरूडकर यांच्यात पाचव्यांदा झुंज होत आहेत. विशेष म्हणजे, कोल्हापूर शहरासह काही मतदारसंघांत नवीन मल्लांबरोबर कुस्ती पाहावयास मिळते.सुशिक्षित मतदारांची वाढणारी संख्या, विकास कामांची होणारी तुलना आणि त्याचे मूल्यमापन होऊन दिली जाणारी उमेदवारी, या सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडे सलग तीन-चार वेळा उमेदवारी मिळणे आणि आर्थिक दृष्ट्या कठीण बनले आहे. अशाही परिस्थितीत सलग सहा-सहा वेळा ताकदीने लढाई करणारे नेतेही या जिल्ह्याने पाहिले आहेत.

वडील आणि मुलासोबतही लढत

  • ‘करवीर’मधून स्वर्गीय पी. एन. पाटील व चंद्रदीप नरके यांच्यात २००९ पासून सलग तीन वेळा लढत झाली. पाटील यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र राहुल व नरके यांच्यात सामना होत आहे.
  • माजी मंत्री जयवंतराव आवळे व डॉ. सुजित मिणचेकर यांच्यात २०१४ लढत झाली होती. त्यानंतर आवळे यांचे सुपुत्र राजू व डॉ. मिणचेकर यांच्यात २०१९ व २०२४ सलग दुसऱ्यांदा लढत होत आहे.
  • दिवंगत नेते यशवंत एकनाथ पाटील व विनय कोरे यांच्यात १९९९ व २००४ ला सामना झाला. त्यानंतर २०१४ ला पाटील यांचे सुपुत्र अमरसिंह यांच्यासोबत लढत झाली.
  • बजरंग देसाई व के. पी. पाटील यांच्यानंतर देसाई यांचे सुपुत्र राहुल यांच्यासोबतही पाटील यांची लढत झाली.

खानविलकर, क्षीरसागर यांच्या विरोधात मल्ल वेगळेचदिविग्जय खानविलकर यांच्या १९८० ते २००९ पर्यंतच्या निवडणुकीत २००९ चा सतेज पाटील यांचा अपवाद वगळता, कोल्हापूर शहरातून राजेश क्षीरसागर चौथ्यांदा रिंगणात, पण प्रत्येक निवडणुकीत प्रतिस्पर्धी वेगवेगळे राहिले.

एकमेकांशी सर्वाधिक वेळा भिडलेले नेते 

  • कागल: सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंह घाटगे - १९७२ ते १९९५
  • कागल: हसन मुश्रीफ व संजय घाटगे - १९९८ ते २०१९
  • चंदगड : नरसिंगराव पाटील व भरमूण्णा पाटील - १९९५ ते २०१४
  • शाहूवाडी : विनय कोरे व सत्यजीत पाटील सरूडकर - २००४ ते २०२४
  • सांगरूळ / करवीर : पी. एन. पाटील व संपतराव पवार - १९९५ ते २००९
  • राधानगरी : के. पी. पाटील व बजरंग देसाई - १९९९ ते २००९
  • राधानगरी : के. पी. पाटील व प्रकाश आबीटकर - २००९ ते २०२४
  • शिरोळ : राजेंद्र पाटील यड्रावकर व उल्हास पाटील - २०१४ ते २०२४
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkagal-acकागलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024