शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
2
"पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
3
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
4
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
5
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतली विशेष काळजी; जवळच्या लोकांना भेटायला न येण्याचे केले आवाहन
6
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
7
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
8
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
9
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
10
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
11
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
12
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
13
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
14
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
15
किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."
16
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
17
Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
18
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
19
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
20
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"

पुढील मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या तीन महिलांना स्थान मिळेल - चित्रा वाघ

By संदीप आडनाईक | Published: July 23, 2023 4:15 PM

महिला आघाडीच्या संघटनात्मक कामासाठी चित्रा वाघ कोल्हापूरात आल्या होत्या. सकाळी अंबाबाईचे दर्शन घेउन त्यांनी कामाला सुरुवात केली.

कोल्हापूर : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात दोन ते तीन महिला आमदारांना स्थान मिळावे, असा आग्रह पक्षाकडे धरल्याचे आणि पक्षानेही याला मान्यता दिली असून यापुढच्या विस्तारात मंत्रिमंडळात महिला मंत्री दिसतील, असे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

महिला आघाडीच्या संघटनात्मक कामासाठी चित्रा वाघकोल्हापूरात आल्या होत्या. सकाळी अंबाबाईचे दर्शन घेउन त्यांनी कामाला सुरुवात केली. जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांची त्यांनी रविवारी भेट घेतली. भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, वाघ म्हणाल्या, पक्षात महिलांना नेहमीच प्राधान्य दिले जाईल. आगामी निवडणुकातही महिला मोठ्या संख्येने सहभागी होतील. आजही विधानसभा आणि विधानपरिषदेत पक्षाच्या सर्वाधिक महिला आमदार आहेत, त्या उत्तम काम करतील.

मणिपूर येथील घटनेविषयी त्या म्हणाल्या, ही विकृती आहे, ती वेळीच ठेचली पाहिजे. परंतु ज्या प्रकारे विरोधक या प्रकरणाचे राजकारण करतात ते निंदाजनक आहे. माल्हा, राजस्थानमध्येही असेच प्रकार घडले, त्यावर कोणीही आवाज का उठवला नाही असा सवाल त्यांनी केला. किरिट सोमय्यांच्या बाबतील जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याची चौकशी सुरु आहे. परंतु ज्या ज्या महिलेला त्रास झाला ती समोर आलेली नाही, तिने संपर्क साधावा, असे आवाहन वाघ यांनी केले.

फुटलेल्या राष्ट्रवादी पक्षाविषयी त्या म्हणाल्या, हे नवीन नाही. मी २०१९ मध्ये पक्ष सोडला, इतरांनी आता सोडला. कार्यकर्त्याला त्याचा पक्ष सोडताना दु:खच होत असते. पण ते सोडावे लागण्याची परिस्थिती निर्माण केली जाते. भाजपमध्ये नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला जी संधी दिली, त्याबद्दल मी समाधानी आहे. 

कोल्हापूरात २५ महिला सेवा संस्थेची नोंदणी, निविदा प्रक्रियेत सहभागी होणारमहिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात भाजपकडून राज्यातील २००० हून अधिक महिला सेवा सहकारी संस्थांची नोंदणी होत आहे. याची सुरुवात कोल्हापूरातून अंबाबाईचा आशिर्वाद घेउन झाली असून जिल्ह्यातील २५ सेवा संस्था नोंदणीककृत केल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली. प्रत्येक संस्थेत सहभागी असलेल्या सुमारे १८ महिला त्या त्या तालुकास्तरावरील शासकिय आणि निमशासकीय कार्यालयातील छोट्या,मोठ्या कामासाठी निविदा प्रक्रियेत सहभागी होतील. सरकार त्यांच्यासाठी कांही निकषही शिथिल करतील, असे वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघkolhapurकोल्हापूरBJPभाजपा