शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Kolhapur- राजाराम कारखाना निवडणूक निकाल: संस्था गटातून महादेवराव महाडिकांची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 11:10 AM

या निवडणुकीत आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणास लागली असून, ‘कंडका’ कोणाचा पडणार, याविषयी जिल्ह्यात उत्कंठा शिगेस पोहोचली आहे.

कोल्हापूर : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालाच्या मतमोजणीस सकाळपासून सुरुवात झाली आहे. निकालाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी महाडिक गटाने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून महाडिक गट हे लीड कायम ठेवणार का हे काही तासात स्पष्ट होणार आहे. 

दुसऱ्या फेरीत महाडिक गटाच्या विजयाला सुरुवात झाली. संस्था गटातून महादेवराव महाडिक ३९ मताने विजयी झाले. विरोधी सचिन पाटील  यांना केवळ ४४ मते मिळाली.रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी सुरु आहे. दोन फेऱ्यात मोजणी प्रक्रिया संपणार असून, पहिली फेरी दुपारी साडेबारापर्यंत संपणार असली तरी दुपारी दोननंतरच निर्णायक आघाडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. अत्यंत ईर्ष्येने झालेल्या या निवडणुकीत आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणास लागली असून, ‘कंडका’ कोणाचा पडणार, याविषयी जिल्ह्यात उत्कंठा शिगेस पोहोचली आहे.निकाल असा -गट क्रमांक1 फेरी क्रमांक १सत्ताधारी महाडिक पॅनेल- भोसले विजय वसंत 3244- मगदूम संजय बाळगोंडा=3169 आमदार सतेज उर्फ बंटी पाटील पॅनल- बेनाडे शालन बाबुराव ( रुई) 2441- भोसले किरण 2413 बाबासो( रूकडी )

उत्पादक गट क्रमांक  2   सत्ताधारी महाडिक पॅनेल - शिवाजी रामा पाटील =.  3198- सर्जेराव बाबुराव भंडारे =3173- अमल महादेवराव महाडिक =3358

 आमदार सतेज उर्फ बंटी पाटील पॅनल- शिवाजी ज्ञानू किबिले =2261- दिलीप गणपतराव पाटील =2328- अभिजीत सर्जेराव माने =2184

गट क्रमांक 3सत्ताधारी महाडिक पॅनेल- डॉ. किडगावकर मारुती भाऊसो  3129- जाधव विलास यशवंत 2934- पाटील सर्जेराव कृष्णा 3051

 आमदार सतेज उर्फ बंटी पाटील पॅनल- गायकवाड बळवंत रामचंद्र (आळवे, ता पन्हाळा) 2158- पाटील विलास शंकर ( भुये, ता करवीर ) 2068- माने विठ्ठल हिंदुराव ( वडणगे, ता करवीर) 2361

उत्पादक गट क्रमांक  4   सत्ताधारी महाडिक पॅनेल- तानाजी कृष्णात पाटील= 3148- दिलीप भगवान पाटील = 3217- मीनाक्षी भास्कर पाटील=3144

 आमदार सतेज उर्फ बंटी पाटील पॅनल- दिनकर भिवा पाटील= 2176- सुरेश भिवा पाटील  =2395- संभाजी शंकर पाटील   =2333

उत्पादक गट क्रमांक ५सत्ताधारी महाडिक गटदिलीप यशवंत उलपे - 3200नारायण बाळकृष्ण चव्हाण - 3130

 आमदार सतेज उर्फ बंटी पाटील पॅनलविजयमाल विश्वास नेजदार- 2375मोहन रामचंद्र सालपे - 2302

संस्था गटातून माजी आमदार महादेराव महाडिक विजयी- महादेवराव महाडिक - 83     - विरोधी - सचिन पाटील - 44   

गट क्रमांक 6 सत्ताधारी महाडिक पॅनलगोविंद चौगले  3246विश्वास बिडकर 3163

आमदार सतेज उर्फ बंटी पाटील पॅनल  - दगडू चौगुले 2413 - शांताराम पाटील  2398

 महिला राखीव गटसत्ताधारी महाडिक पॅनल - कल्पना पाटील : 3255 - वैष्णवी नाईक : 3195

आमदार सतेज उर्फ बंटी पाटील पॅनल  - निर्मला पाटील : 2493 - पुतळाबाई मगदूम  : 2345

 इतर मागासवर्गीय गटसत्ताधारी महाडिक पॅनल - संतोष पाटील : 3219आमदार सतेज उर्फ बंटी पाटील पॅनल  - मानसिंग खोत :2456

 भटके विमुक्त गटसत्ताधारी महाडिक पॅनल - सुरेश तानगे  : 3265आमदार सतेज उर्फ बंटी पाटील पॅनल  - अण्णा रामन्ना : 2419

 *अनुसूचित जाती जमाती गट सत्ताधारी महाडिक पॅनल - नंदकुमार भोपळे  : 3193आमदार सतेज उर्फ बंटी पाटील पॅनल  - बाबासो देशमुख  :  2371

‘राजाराम’ कारखान्याची सत्ता मिळवायचीच या ईर्ष्येने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील हे रिंगणात उतरले होते. ‘गोकुळ’मधील सत्ता गमावल्यानंतर अतिशय आक्रमकपणे निवडणुकीची रणनीती करत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कोणत्याही परिस्थितीत सत्ता हातून सोडायची नाही, या इराद्याने ते मैदानात उतरले होते. त्यामुळे या निवडणुकीत कमालीची ईर्षा पाहावयास मिळाल्याने रविवारी ९१.१२ टक्के मतदान झाले होते. संस्था गटाची मोजणी शेवटीसंस्था गटात सत्तारूढ आघाडीकडून माजी आमदार महादेवराव महाडिक, तर विरोधी आघाडीकडून सचिन पाटील यांच्यात झुंज होत आहे. येथे मर्यादित १२९ पैकी १२८ जणांनी मतदान केले. महाडिक यांनी आपल्याकडे ९० मते, तर सतेज पाटील यांनी ७५ मते आपल्यासोबत असल्याचा दावा केल्याने या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. हे मतदान केंद्र क्रमांक ५८ मध्ये झाल्याने शेवटी मोजणी होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलAmal Mahadikअमल महाडिकMahadevrao Mahadikमहादेवराव महाडिक