संदीप बावचेजयसिंगपूर : चिपरी ( ता. शिरोळ) येथील घोडावत जॉगरी कारखान्याने उसाची पहिली उचल जाहीर न करताच ऊसतोड सुरू केली होती. काल, मंगळवारी रात्री निमशिरगाव येथून उसाची वाहतूक सुरू असताना संतप्त कार्यकर्त्यांनी उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ४०० रूपयेच्या दुसऱ्या हप्त्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. गेल्या ७ दिवसापासून राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा सुरू आहे. तसेच ४०० रूपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. चिपरी येथील घोडावत जॉगरी कारखान्याने उसाची पहिली उचल जाहीर न करताच ऊसतोड सुरू केली होती. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. ऊसदर आंदोलनाची ठिणगी पडल्याने कारखाने लवकर सुरू होतील अशी चिन्हे सद्यातरी दिसत नाहीत. ऊस परिषदेत ही कोणता निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे
ऊस दर आंदोलनाचा भडका, कोल्हापुरातील निमशिरगाव येथे ट्रॅक्टर पेटवला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 11:13 AM