शेंडूर (ता. कागल) येथील लोकसहभाग आणि लोकवर्गणीच्या जोरावर २० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले. याचे छत्रपती शिवाजी महाराज कोविड सेंटर असे नामकरण करत प्रांताधिकारी प्रसन्नेजित प्रधान व तहसीलदार ठोकडे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच अमर कांबळे होते.
यावेळी गावकऱ्यांना गावातच कोरोनामुक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तरुणांचे प्रधान यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सभापती पूनम मगदूम, गटविकास अधिकारी सुशील संसारे, उपसरपंच अजित डोंगळे, राजेंद्र पाटील, बाबूराव शेवाळे, निखिल निंबाळकर, लक्ष्मण गोरडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी गुणाजीकाका निंबाळकर, निवृत्ती निकम, सुखदेव मेथे, संदीप लाटकर, अनिल मोरे, सचिन माने, राजू मुजावर, अवधूत गुरव, ग्रामसेवक मगदूम आदी उपस्थित होते.
अशी घेतली जाते काळजी...
येथील कोविड सेंटरमध्ये पाच रुग्ण दाखल आहेत.