सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून एआयसीटीई (नवी दिल्ली) व शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) यांनी डीकेटीईमध्ये ही अभियांत्रिकी शाखा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ए.आय. म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखी अनुभवातून शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये व त्या चालविणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅममध्ये आणणे. ए.आय. ही संगणक अभियांत्रिकीचीच एक शाखा असून, प्रगत अग्लोरिदम आणि प्रोग्रॅमिंगवर लक्ष केंद्रित करून निर्माण झालेली शाखा आहे.
लॅब उद्घाटनप्रसंगी मानद सचिव सपना आवाडे, किशोरी आवाडे, ए. बी. सौंदत्तीकर, बी. बी. कागवाडे, प्रकाश मोरे, आदी उपस्थित होते. लॅबच्या मंजुरीसाठी प्रा. डॉ. आर. एन. पाटील यांनी विशेष प्रयत्न केले असून, त्यांना प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, प्रा. डॉ. यु. जे. पाटील, प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, डॉ. डी. व्ही. कोदवडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
(फोटो ओळी)
१३१२२०२०-आयसीएच-०१
इचलकरंजीतील ‘डीकेटीई’मध्ये ए.आय. अॅण्ड डिप लर्निंग लॅबचे उद्घाटन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, किशोरी आवाडे, सपना आवाडे, डॉ. पी. व्ही. कडोले, आदी उपस्थित होते.