कोल्हापूर : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने सोमवारी शिवाजी चौकात वीज बिल भरणार नाही, या आशयाच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. ‘वीज बिल भरणार नाही, माफ करा’ या घोषणा देण्यात आल्या.
निवास साळोखे, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव अनिल पोतदार (हुपरीकर) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, जयकुमार शिंदे, सुजित चव्हाण, शिवाजी पाटील, बन्सी चिपडे, नंदकुमार ओसवाल, राजू बारस्कर, शीतल पोतदार, आदी उपस्थित होते. दरम्यान, गांधी मैदान येथून ७ जानेवारी २०२१ रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात वाहनांसह सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कृती समितीला कामानिमित्त सराफ व्यापारी संघाचा हॉल वापरण्यास घ्यावा, असे संघाचे अध्यक्ष गायकवाड यांनी सांगितले.
फोटो ओळी : सराफ संघाच्या वतीने वीज बिल भरणार नाही, या आशयाच्या फलकाचे सोमवारी शिवाजी चौकात उद्घाटन करण्यात आले. यावेळी निवास साळोखे, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, कुलदीप गायकवाड, अनिल पोतदार, बाबासाहेब पाटील-भुयेकर, आदी उपस्थित होते. (फोटो-२११२२०२०- कोल- सराफ संघ)
- राजाराम लोंढे