गारगोटी,
खंडर झालेल्या शाळेचा लोकसहभागातून कायापालट करून भव्य अशी स्वागत कमान उभारून बशाचामोळा शाळेने प्रेरणादायी काम केले असल्याचे गौरवोद्गार आमदार प्रकाश आबिटकर यांनी काढले
ते भुदरगड तालुक्यातील पश्चिम टोकाला असणाऱ्या 'बशाचामोळा' या छोट्या शाळेने लोकसहभागातून उभारलेल्या स्वागत कमानीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
लोकसहभागतून अनेक शालेय भौतिक सुविधा साकारल्या आहेत .त्यातील सर्वात भव्य सुविधा म्हणजे शालेय स्वागत कमान. हिचे शनिवारी उद्घाटन झाले. ही भव्य स्वागत कमानी मठगावचे नूतन उपसरपंच चंद्रकांत पवार-पाटील यांच्या योगदानातून साकारली आहे. कै. तुकाराम बाळकृष्ण पवार-पाटील यांच्या स्मरणार्थ उभारली आहे. या कमानीसाठी त्यांनी जवळपास दीड लाख रूपये खर्च केले.
आमदार प्रकाश आबिटकर व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत भागीरथी तुकाराम पवार पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन केले. कै. तुकाराम पवार पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक सचिन देसाई यांच्या हस्ते चंद्रकांत पवार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पवार कुटुंबातील सर्व सदस्य तसेच बशाचामोळा गावातील ग्रामस्थ हजर होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, बी.एस देसाई,उद्योगपती बी. डी. पाटील,बाबा नांदेकर, कल्याणराव निकम, दत्तात्रय उगले, प्रकाश पाटील, संदीप वरंडेकर,नूतन सरपंच निशा संकपाळ, उपसरपंच चंद्रकांत पवार, आनंदा ढोकरे, शांताराम पवार पाटील आदी. उपस्थित होते.
प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सचिन देसाई यांनी केले तर आभार उपशिक्षक दिग्विजय कोटकर यांनी मानले
१४ बशाचामोळा शाळा कमान
फोटो ओळ - स्वागत कमानीच्या उद्घाटन प्रसंगी आमदार आबिटकर, बी. एस. देसाई,सचिन देसाई,संदीप वरंडेकर, निशा संकपाळ आदी