कोरोना जागतिक महामारीने पुन्हा एकदा आपले डोके वर काढले असून, सर्वांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच सॅनिटायझरचा वापर करणे व साबणाने हात धुवावेत तसेच पांगिरे आणि परिसरातील ४५ वर्षांवरील सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ . चंद्रकांत परूळेकर यांनी केले. ते पांगिरे (ता. भुदरगड) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात पांगिरे येथील कोविड लसीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी सरपंच सर्जेराव पाटील, परिचारिका दीपाली जगताप, ग्रा. स. मारुती भराडे, डॉ. सुनील लाड, डॉ. अनिल कुरणे, आर. ए. नाईक, नागेश साळोखे, आरोग्य कर्मचारी व आशा सेविका उपस्थित होते.
पांगिरे येथे कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:26 AM