परिसरातील रुग्णांना मध्यवर्ती ठिकाण असल्याने या कोविड केंद्राचा गोरगरीब रुग्णांना लाभ होणार असून, या कोविड केंद्राचे उद्घाटन शाहीर डॉ. आझाद नायकवडी व कळे-सावर्डे धरण सोसायटीचे अध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजित पाटील यांनी कुंभी धामणी संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आलेले हे कोविड केंद्र तीन ते चार तालुक्यांसाठी मध्यवर्ती असून, या कोविड केंद्रामध्ये ऑक्सिजन बेडसह इतर सुविधा असून, येत्या काही दिवसांत या कोविड केंद्राची मर्यादा ३० वरून ५० पेक्षा जास्त बेडची करण्याचा आमचा मानस आहे. हे कोविड केंद्र पूर्णपणे मोफत असून या केंद्राचा उपयोग गोरगरीब रुग्णांसाठी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी गगनबावड्याचे माजी सभापती बंकट थोडगे, इंद्रजित पाटील, बैतुलमाल कमिटीचे जाफरबाबा, सुळेचे सरपंच कृष्णात पाटील, कोदवडेचे सरपंच नारायण ढेरे, भैरव विद्यानिकेतनचे संस्थापक श्रीकांत पाटील, डॉ. तानाजी पाटील, एस. एस. पाटील यांच्यासह कुंभी-धामणी सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.