वळीवडे : गांधीनगर मुख्य रस्ता कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण, तसेच गटारांचे काम अशा एकूण ६५ लाख रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या वंदना पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे, पंचायत समिती सदस्या शोभा राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
गांधीनगर वळीवडे (ता. करवीर) येथील कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या गांधीनगर ते वळीवडे या रस्त्याच्या कामाला रविवारी मूर्त स्वरूप प्राप्त झाले. ६५लाखांचा निधी वापरून कॉंक्रिटीकरण रस्ता बनविला आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास विजय चौगले, उपसरपंच सुषमा शिंगे, माजी उपसरपंच प्रकाश शिंदे, सचिन चौगुले, भगवान पळसे, अरुण पोवार, राजाराम कुसाळे, हेमलता माने, सैनाज नदाफ, सुरेखा चव्हाण, उज्ज्वला पोवार, वैशाली घाटगे, अनिता खांडेकर, संगीता चव्हाण, विलास मोहिते, दीपक पासान्ना, बळी खांडेकर, सुहास तामगावे, अमर निरंकारी, अरविंद मोहिते, प्रल्हाद शिरोटे, रघुनाथ जगताप, ग्रामविकास अधिकारी बी. डी. पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळ:-गांधीनगर ते वळीवडे मुख्य रस्त्याचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते.