माने म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता ग्रामीण भागात कोरोना कोविड केअर केंद्राची असणारी गरज या केंद्रामुळे पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या लढाईत जनतेने सरकारसोबत राहण्याचे व स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन केले.
संस्थापक डॉ. शुभांगी पाटील यांनी, हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवरील शस्त्रक्रिया पार पडल्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हॉस्पिटलमध्ये शासनाकडून रॅपिड अॅँटिजेन टेस्टसाठी मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जि.प. सदस्य प्रसाद खोबरे, देवानंद कांबळे, डॉ. प्रदीप पाटील, दशरथ पिष्टे, सचिन पोवार, सावकार हेगडे, धनाजी शेवाळे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
२२०४२०२१-आयसीएच-०२
कोरोची (ता.हातकणंगले) येथील श्री भैरवनाथ शिक्षण समूहाच्या कोरोना कोविड केअर केंद्राचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांनी फीत कापून केले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. शुभांगी पाटील उपस्थित होते.