भुदरगड तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांना दवाखाने कमी पडत आहेत, या पार्श्वभूमीवर देवराज बारदेस्कर यांनी शिक्षण संकुलात ५० बेडचे कोविड सेंटर उभारून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली असून त्यांचे हे कार्य समाजाला दिशादर्शक ठरणार आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार धनंजय महाडिक यांनी काढले.
गारगोटी येथे मनवेल बारदेस्कर एज्युकेशन सोसायटीमार्फत ५० बेडचे कोरोना सेंटर उभारले आहे, त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख उपस्थितीत माजी आमदार बजरंग देसाई, कागलचे माजी आमदार संजय घाटगे, भुदरगड आजराचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी होते. तहसीलदार अश्विनी आडसूळ, तालुका वैद्याकीय अधिकारी डॉ. सचिन यत्नाळकर, डॉ. भगवान डवरी, डॉ. मिलिंद कदम, माजी जि.प. सदस्य प्रा. अर्जुन आबिटकर, माजी गोकुळ संचालक धैर्यशील देसाई, तलाठी राजू शिंदे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणसिंह सावंत, भाजप तालुका अध्यक्ष अवधूत परुळेकर, पंचायत समिती सदस्या आक्काताई नलवडे, महाडिक युवा शक्ती तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे, गारगोटी सरपंच संदेश भोपळे, दिगंबर देसाई, प्रकाश वास्कर, युवराज पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक देवराज बारदेस्कर यांनी प्रास्ताविक केले तर आभार तानाजी पाटील यांनी मानले.
फोटो ओळ
गारगोटी येथे कोविड सेंटरचे उद्घाटन करताना धनंजय महाडिक, देवराज बारदेस्कर, नंदकुमार शिंदे, संपत खिलारी, अश्विनी आडसूळ, प्रवीणसिंह सावंत आदी.