कोल्हापूर : दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतरही ‘लोकमत’महामॅरेथॉनच्या पाचव्या पर्वाला उदंड प्रतिसाद मिळाला. उद्या, रविवारी पहाटे यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले असून आज, शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘बीब एक्स्पो’लाही दणक्यात सुरूवात झाली. सायंकाळपर्यंत पोलिस प्रशासनाच्या ‘अलंकार’ सभागृहा ठिकाणी गुडी बॅग किटचे वितरण सुरू राहणार आहे.शाहू छत्रपती यांच्या हस्ते फुगे सोडून या ‘बीब एक्स्पो’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या एक्स्पोच्या निमित्ताने पोलिस प्रशासनाचे ‘अलंकार’ सभागृह आणि परिसर अक्षरश नटून गेला आहे. फुग्यांची सजावट, लोकमत महामॅरेथॉनची माहिती देणारे विविध डिजिटल फलक, प्रायोजकांचे रंगीबेरंगी स्टॉल्स यामुळे इथे वेगळाच माहोल तयार झाला आहे. सकाळी दहा पासूनच या ठिकाणी खेळाडू आणि नागरिकांनी कीट नेण्यासाठी गर्दी केली.
मुख्य कार्यक्रमाआधी प्रा. सचिन जगताप आणि त्यांचे चिरंजीव सोहम यांच्या बासरी आणि संतुर जुगलबंदीचा उपस्थितांना श्रवणीय अनुभव घेता आला. त्यांना प्रशांत देसाई यांनी तबला साथ केली.लोकमत महामॅरेथॉनबाबत बोलताना छत्रपती शाहू म्हणाले, ‘लोकमत’च्या वतीने गेली काही वर्षे सातत्याने उत्तम पद्धतीने महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. मी सर्व स्टॉल्सवर फिरताना मला जाणवले की केवळ युवकच नाही तर ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धही अतिशय उत्साहाने या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत ही आनंदाची बाब आहे. ‘लोकमत महामॅरेथॉन’ महाराष्ट्रातील युवा शक्तीचे संघटन करण्यात कोठेही कमी पडणार नाही असा विश्वास मला वाटतो.‘लोकमत महामॅरेथॉन’च्या हेड रूचिरा दर्डा, म्हणाल्या, महामॅरेथॉनच्या या आयोजनामुळे खुप आनंदाचे वातावरण आहे. सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी एक उत्साहाचे चित्र निर्माण झाले असून याच पध्दतीने ही महामॅरेथॉन यशस्वी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.यावेळी छत्रपती शाहू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक माेहन येडूरकर, ‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक योगेश गोडबाेले, घोडावत कझ्युंमरचे संचालक साहिल शहा, ऑयकॉन स्टीलच्यावतीने उत्तम फराकटे, जय चंदवाणी, प्रकाश पाटील, डॉ. संदीप पाटील, कोटक महिंद्राचे शाखाधिकारी अक्षय कांबळे, निलेश पाटील यावेळी उपस्थित होते.‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, असि.व्हाईस प्रेसिडेंट मकरंद देशमुख, इव्हेंटचे महाराष्ट्र, गोव्याचे हेड रमेश डोडवाल, मीडिया हेड आशिष जैन, रेस डायरेक्टर संजय पाटील यांच्यासह विभागप्रमुखांनी उपस्थितांचे स्वागत केले.प्रवेशव्दारावरच खेळाडूंच्या नावांची यादीसभागृहाच्या प्रवेशद्वारावरच सहभागी नागरिक, खेळाडू यांची किलोमीटर्सनुसार स्वतंत्र यादी लावण्यात आली होती. ठळक अक्षरात लावलेल्या या नावांच्या फलकांमुळे नाव अन् नंबर शोधण्यात नागरिकांना कोणतीच अडचण येत नव्हती.