शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

लोकल फॉर व्होकलला प्रोत्साहन : नरेंद्र मोदी; कोल्हापुरातील एक स्थानक, एक उत्पादन स्टॉलचे लोकार्पण 

By संदीप आडनाईक | Published: March 12, 2024 1:07 PM

कोल्हापुरी गूळ, चपला एका स्टॉलवर

कोल्हापूर : लोकल फॉर व्होकल अशी भूमिका ठेवून रेल्वे स्थानकावर सर्वप्रकारचे स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक स्थानक, एक उत्पादन योजनेचा प्रारंभ केला आहे. यातून पर्यटनालाही चालना मिळेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.भारतीय रेल्वेच्या आधुनिकिकरण या योजनेअंतर्गत प्रायोगिक तत्वावर विविध रेल्वे स्थानकांवर ही केंद्रे उघडली आहेत. ८५ हजार कोटीहून अधिक किमंतीच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि देशाला लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी १० वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांसह इतर रेल्वे सेवांचाही हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. कोल्हापुरातील एक स्थानक, एक उत्पादन स्टॉलचे लोकार्पणही या कार्यक्रमात मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.या समारंभाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आदी ऑनलाईन उपस्थित होते.कोल्हापुरातील कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक म्हणाले, वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापुरसाठी सुरु करावे यासाठी खूप प्रयत्न केले. प्रतिक्षा यादीत कोल्हापुरचे नाव आहे. कांही तांत्रिक बाबींमुळे ही रेल्वे आज सुरु झाली नसली तरी लवकरच ती सुरु करण्यासाठी पाठपुरावा करु. 

यावेळी भाजपचे समरजितसिंग घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, रुपाराणी निकम, संजय सावंत, अजित कामत, विजयसिंह खाडे, किरण नकाते, डॉ. सदानंद राजवर्धन उपस्थित होते. या समारंभाला रेल्वेच्या गतिशक्ती विभागाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक प्रकाश उपाध्याय, विभागीय यांत्रिक अभियंता (ऑपरेशन) दीपक खाेत, कर्मचारी आणि कल्याण निरिक्षक सुनेत्रा राणे, वाणिज्य विभागाच्या मनिषा प्रभुणे, रेल्वेचे स्टेशन व्यवस्थापक राजन मेहता, सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, जयेश ओसवाल, मोहन शेट्टी, सदाशिव सातपुते उपस्थित होते. मुख्य कार्यालयीन अधीक्षक अनिल कदम यांनी सूत्रसंचालन केले.

कोल्हापुरी गूळ, चपला एका स्टॉलवररेल्वेने स्थानिक उत्पादने विक्रीला चालना मिळण्यासाठी एक स्थानक, एक उत्पादन योजना कोल्हापुर रेल्वे स्थानकांवर सुरु केले आहे. योजने अंतर्गत स्थानिक विक्रेत्यांना आपली उत्पादने विकण्यासाठी रेल्वे स्थानकांवर विशिष्ट आउटलेट दिले आहेत. यापैकी भगिरथी महिला मंचच्या स्टॉलवर कोल्हापुरी मसाले, कोल्हापुरी गूळ, बांबुच्या विविध स्वदेशी उत्पादनांचा समावेश आहे तर एका स्टॉलवर कोल्हापुरी चप्पल उपलब्ध आहेत. स्थानिक कारागीर, शिल्पकार आणि कामगारांना या स्टॉलचा फायदा मिळणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेNarendra Modiनरेंद्र मोदी